bappa.org
Maharashtra Ganeshotsav Archive
2026-02475
माझा बाप्पा. माझी गोष्ट. आपला गणेशोत्सव
नमस्कार! ❤️ प्रत्येकाच्या आयुष्यात गणपती बाप्पा म्हणजे काहीतरी वेगळं असतं... काहींसाठी उत्सव, काहींसाठी परंपरा... पण माझ्यासाठी गणपती बाप्पा म्हणजे घरभर पसरलेला आनंद, कुटुंबाची एकत्र येणारी माणसं आणि खूप सुंदर आठवणी. गणेशोत्सव जवळ आला की आमच्या घरात तयारी सुरू होते... डेकोरेशनचं प्लॅनिंग, प्रसादाची तयारी, नवीन कपडे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बाप्पा घरी येणार याची उत्सुकता. 🌺🙏 लहानपणी गणपतीची वाट बघायचो... आता शार्वीला बाप्पासाठी उत्सुक होताना पाहते, तेव्हा माझं बालपण पुन्हा जगल्यासारखं वाटतं. आमच्या घरी गणपती म्हणजे फक्त पूजा नाही... तर सगळे एकत्र बसणं, आरती म्हणणं, मोदक खाणं, फोटो काढणं आणि छोट्या छोट्या क्षणांचा आनंद घेणं. मला गणेशोत्सवात सर्वात जास्त आवडतं ते म्हणजे... या काही दिवसांत घरात निर्माण होणारी सकारात्मक ऊर्जा. जणू बाप्पा आल्यावर घरात आनंद, समाधान आणि आशीर्वाद घेऊन येतात. ✨ आणि मग येतो तो निरोपाचा दिवस... "पुढच्या वर्षी लवकर या" म्हणताना डोळे थोडे पाणावतात... कारण बाप्पा जातात, पण त्यांच्या आठवणी आणि आशीर्वाद कायम सोबत राहतात. ❤️ म्हणूनच माझ्यासाठी गणेशोत्सव म्हणजे... फक्त एक सण नाही, तर श्रद्धा, प्रेम, कुटुंब आणि सुंदर आठवणींचा उत्सव आहे. माझा बाप्पा. माझी गोष्ट. आपला गणेशोत्सव. 🙏🌺
- Kind
- Story
- Place
- Pune
- Art
- The Art of Memory (Dhāraṇā-mātṛkā) · Kala 62
- Contributed by
- Recorded, name withheld by the contributor
- Submitted
- 20 September 2026
- Accepted
- 20 September 2026
Evidence
This entry is record #2485 in a hash chain of 2,489. Each record commits to the one before it, so a change to any earlier record breaks every hash after it.
Record hash165494a70354f456c4fa0903e364c45087d29d676a54c4581de7cca71ce81168
Chain headdb1237cba7352a11c063a3c7f1890d946d1d262fdbf5d619dbf2c4c09e750f13
The chain verifies end to end as of this page load.


