bappa.org
Maharashtra Ganeshotsav Archive
2026-02473
Arogyacha Shri Ganeshaa

*गणरायाच्या साक्षीने आरोग्य तपासणीचा उपक्रम* *‘लोकसंवाद-२०२६’च्या माध्यमातून भाविकांसह नागरिकांची आरोग्य तपासणी* गोंदिया, दि. १८ : ‘लोकसंवाद-२०२६’च्या माध्यमातून नवीन प्रशासकीय इमारत परिसरातील गणरायाच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांसह नागरिकांची आरोग्य तपासणी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ पुरुषोत्तम पटले यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली. धावपळीच्या जीवनशैलीमुळे वाढणारा ताणतणाव आणि आरोग्यविषयक समस्या लक्षात घेऊन गणेशोत्सवादरम्यान आरोग्य विभागाच्यावतीने या आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिरात रक्त तपासणी, रक्तदाब तपासणी तसेच अन्य प्राथमिक आरोग्य तपासण्यांसाठी आवश्यक साधने उपलब्ध करून देण्यात आली होती. शासकीय रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी डॉ सुवर्णा हुबेकर आणि स्टाफ यांनी नागरिकांची तपासणी करून त्यांना आरोग्यविषयक मार्गदर्शन केले. गणरायाच्या दर्शनासाठी आलेले भाविक, प्रशासकीय कामांसाठी येणारे नागरिक तसेच परिसरातील अन्य नागरिकांनी या आरोग्य शिबिराचा लाभ घेतला. आरोग्य तपासणीदरम्यान उपविभागीय अधिकारी चंद्रकांत खंडाईत, तहसीलदार समशेर पठाण, जिल्हा माहिती कार्यालयातील वरिष्ठ लिपिक धम्मदीप बोरकर यांच्यासह अन्य कर्मचारी उपस्थित होते. माहिती व जनसंपर्क विभागाच्या संयुक्त विद्यमाने आयोजित हे आरोग्य शिबिर शुक्रवारी नवीन प्रशासकीय इमारत परिसरात संपन्न झाले. गणेशोत्सवाच्या माध्यमातून भक्तीबरोबरच नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेण्याचा संदेश या उपक्रमातून देण्यात आला.
- Kind
- Story
- Place
- Beed
- Art
- Rules of Discipline (Vainayikī vidyā) · Kala 63
- Contributed by
- Recorded, name withheld by the contributor
- Submitted
- 19 September 2026
- Accepted
- 20 September 2026
Evidence
This entry is record #2483 in a hash chain of 2,622. Each record commits to the one before it, so a change to any earlier record breaks every hash after it.
Record hash3bddecb049cda5cf133bcfbc077b59c7b5eebd954635f982b4d52a2726b8e1f4
Chain head4cd933ea9050a4fe79dbd86ec0afd6f458b284c3e4014be6fe32a25c3121b621
The chain verifies end to end as of this page load.


