bappa.org
Maharashtra Ganeshotsav Archive
2026-02469
बारी परिवाराचा गणपती

यावर्षीही श्री गणेशाची मूर्ती मी शाडू मातीपासून साकारली आहे. गणपती बाप्पाच्या सजावटीतून आपल्या मातीशी आणि शेतकऱ्याच्या जीवनाशी असलेलं नातं जपण्याचा छोटासा प्रयत्न केला आहे. मातीच्या भिंतीचं आणि सुळीच्या घराचं सुंदर रूप, वृंदावन, घराच्या शेजारी डोलणारं हिरवं शेत, त्यामध्ये उगवलेले गहू, बैलगाडी, विहीर आणि शेतकऱ्याचा साथीदार असलेले बैल अशा अनेक गोष्टींमधून गावाकडच्या साध्या, सुंदर आणि समृद्ध जीवनाची झलक साकारली आहे. या सजावटीतून “मातीशी नातं, शेतकऱ्याचा सन्मान आणि निसर्गाची जपणूक” हा संदेश देण्याचा माझा प्रयत्न आहे. 🙏🌾🐂 गणपती बाप्पा मोरया! 🌺
- Kind
- Story
- Place
- Jalgaon
- Art
- Arranging a Chamber (Śayana-racanā) · Kala 41
- Contributed by
- Recorded, name withheld by the contributor
- Submitted
- 20 September 2026
- Accepted
- 20 September 2026
Evidence
This entry is record #2479 in a hash chain of 2,622. Each record commits to the one before it, so a change to any earlier record breaks every hash after it.
Record hashba68512083d5d7e5b82eea6e1dc9c63d8deb9d9cd100a2ff9025da6f44b77c71
Chain head4cd933ea9050a4fe79dbd86ec0afd6f458b284c3e4014be6fe32a25c3121b621
The chain verifies end to end as of this page load.


