bappa.org
Maharashtra Ganeshotsav Archive
2026-02409
Ganesh Pandol and Loksanwad

*गणपती बाप्पाच्या सान्निध्यात जन-कल्याण*: डॉ सुवर्णा हुबेकर *गणेशोत्सवाद्वारे सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचत आहेत शासकीय योजना!* गोंदिया: येथील नवीन प्रशासकीय भवन परिसरात स्थापन करण्यात आलेल्या सार्वजनिक गणेशोत्सव मंडपात यंदा भक्तीसोबतच जनजागृतीचा आगळा-वेगळा संगम पाहायला मिळत आहे. 'लोकसंवाद-२०२६' अभियानाअंतर्गत बाप्पाच्या दर्शनासाठी येणाऱ्या गर्दीला शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांशी थेट जोडले जात आहे.जिल्हा माहिती अधिकारी श्रीमती अंजू निमसरकर आणि जिल्हा शल्य चिकित्सक डॉ पुरुषोत्तम पटले यांच्या नेतृत्वाखाली हा नावीन्य पूर्ण उपक्रम राबविण्यात येत आहे. 📌 *उपक्रमाची मुख्य वैशिष्ट्ये:* *माहिती फलकांची व्यवस्था:* मंडप आणि प्रशासकीय परिसरात कृषी, आरोग्य, महिला व बालविकास, कौशल्य विकास आणि सामाजिक न्याय विभागाशी संबंधित महत्त्वाचे माहिती फलक लावण्यात आले आहेत. *थेट जनसंवाद:* बाप्पाचे दर्शन आणि प्रशासकीय कामांसाठी येणारे नागरिक सहजपणे आपल्या कुटुंबासाठी लाभदायक योजनांची माहिती घेत आहेत. *उत्सवाचा सदुपयोग:* धार्मिक आणि सांस्कृतिक सणाच्या या विशाल जनसहभागाच्या व्यासपीठाचा उपयोग सामाजिक विकास आणि जनहितासाठी केला जात आहे. आरोग्य विभागाच्या वैयक्तिक लाभाच्या योजना आणि सर्व राष्ट्रीय आरोग्य अभियान कार्यक्रम या विषयावर भव्य आरोग्य प्रदर्शनी आरोग्य संवाद या निमित्ताने येथेवैद्यकीय अधिकारी डॉ सुवर्णा हुबेकर यांच्या नेतृत्वाखाली प्रदर्शित करण्यात आली आहे. या लोकसंवाद उपक्रमाला गोंदिया जिल्ह्यातील नागरिक भरघोष प्रतिसाद देत आहेत हे विशेष!
- Kind
- Story
- Place
- Gondia
- Art
- Rules of Discipline (Vainayikī vidyā) · Kala 63
- Contributed by
- Recorded, name withheld by the contributor
- Submitted
- 20 September 2026
- Accepted
- 20 September 2026
Evidence
This entry is record #2419 in a hash chain of 2,430. Each record commits to the one before it, so a change to any earlier record breaks every hash after it.
Record hash34472b722afe98f76dd3e915ac5fe566989fbd1c31aa45b992f81ce204394c63
Chain head5ad28400ad69f108e9700e5edbdc4f1c1c1b6c19f88622f5a24c8211cc1d60a8
The chain verifies end to end as of this page load.


