bappa.org
Maharashtra Ganeshotsav Archive
2026-02328
Prem Mandir
३८० तासांच्या अथक मेहनतीतून साकारले ६ फूट उंचीचे 3D प्रिंटेड प्रेम मंदिर पुणे/इचलकरंजी : आधुनिक तंत्रज्ञान आणि पारंपरिक कलाकुसरीचा सुंदर संगम साधत Trikriti Studio तर्फे तब्बल ६ फूट उंचीचे प्रेम मंदिर 3D प्रिंटिंग तंत्रज्ञानाच्या माध्यमातून साकारण्यात आले आहे. हे मंदिर तयार करण्यासाठी तब्बल ३८० तासांचा प्रिंटिंग वेळ लागला. या संपूर्ण निर्मितीमध्ये मंदिराच्या प्रत्येक भागातील बारकावे, नक्षीकाम, खांब, कमानी आणि शिखर यांची विशेष काळजी घेण्यात आली आहे. श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीच्या २०२६ सालच्या सजावटीपासून प्रेरणा घेत या मंदिराची रचना व सजावट करण्यात आली आहे. “कल्पनेला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देऊन भारतीय संस्कृती आणि कलाकुसर लोकांपर्यंत पोहोचवणे” हा या प्रकल्पामागील मुख्य उद्देश आहे. 3D प्रिंटिंगच्या माध्यमातून एवढ्या मोठ्या आकाराचे आणि इतक्या बारकाव्यांनी युक्त मंदिर साकारण्याचा हा एक अनोखा प्रयोग असल्याचे Trikriti Studio कडून सांगण्यात आले. गणेशोत्सवाच्या पवित्र वातावरणात हे मंदिर श्री गणरायाच्या चरणी अर्पण करण्यात आले असून, मंदिराच्या भव्यतेसोबतच त्यातील सूक्ष्म कलाकुसर आणि 3D प्रिंटिंग तंत्रज्ञानामुळे हे विशेष आकर्षण ठरत आहे.
- Kind
- Story
- Place
- Pune
- Art
- Architecture (Vāstu-vidyā) · Kala 29
- Contributed by
- Recorded, name withheld by the contributor
- Submitted
- 19 September 2026
- Accepted
- 20 September 2026
Evidence
This entry is record #2338 in a hash chain of 2,415. Each record commits to the one before it, so a change to any earlier record breaks every hash after it.
Record hash053e8ad53265dbe418fff213444e27cc2073738f3551a91d8893acfd2603c04b
Chain head660ad7ad21bb20a13a2d35df88672b0ca313c32de5b3230da115b1abf107d90e
The chain verifies end to end as of this page load.


