bappa.org
Maharashtra Ganeshotsav Archive
2026-02168
श्री अष्टविनायक तरुण मंडळ कोरवली

श्री अष्टविनायक तरुण मंडळ कोरवली तालुका मोहोळ जिल्हा सोलापूर या गणेशोत्सवाची स्थापना 1997 साली करण्यात आली गावातील तरुण वर्गांनी एकत्र येऊन गावामध्ये आमच्या मंडळाची स्थापना केली 1997 पासून आज पर्यंत प्रत्येक गणेश उत्सवा दरम्यान अनेक विविध सांस्कृतिक कार्यक्रम सामाजिक कार्य हाती घेऊन हा उत्सव मोठ्या आनंदाने साजरा करतात मंडळातील अनेक सदस्य शिक्षक व सरकारी नोकरी तसेच प्रावेट नोकरीवर असल्याने गणपती फक्त सात दिवसाचा असतो यादरम्यान मंडळातील सर्व सदस्य एकत्रित येऊन उत्सव साजरा करतात आमच्या मंडळाचे खास वैशिष्ट्य म्हणजे शालेय विद्यार्थ्यांची लेझीम झांज टिपरी तसेच छोट्या मुलींचा डान्स हा कार्यक्रम मिरवणुकी दरम्यान घेण्यात येतो तसेच प्रत्येक वर्षी रक्तदान शिबिर मोठ्या प्रमाणात राबवण्यात येतो यातून एक सामाजिक बांधिलकी जपली जाते
- Kind
- Story
- Place
- कोरवली तालुका मोहोळ जिल्हा सोलापूर
- Art
- Dance (Nṛtyam) · Kala 7
- Contributed by
- Recorded, name withheld by the contributor
- Submitted
- 19 September 2026
- Accepted
- 19 September 2026
Evidence
This entry is record #2178 in a hash chain of 2,199. Each record commits to the one before it, so a change to any earlier record breaks every hash after it.
Record hash2cab473541956ea41816225dbcbfcc7a8022534c2bc11b9e04fff0131daf1cf1
Chain head68658e24c40db232246965b1d66c8b4a464e87c923f635730be6ad755006c23f
The chain verifies end to end as of this page load.


