bappa.org
Maharashtra Ganeshotsav Archive
2026-02162
उकडीचे मोदक

1. प्रथम एका टोपामध्ये चार कप पाणी घ्यावे. 2. एक टी स्पुन मिठ व एक चमचा तेल टाकावे. 3. नंतर ते ग्यास वर उकळी येण्यासाठी ठेवावे. 4. एका बाजूला ग्यासवर चार कप ओल्या खोबऱ्याचा कीस, दोन कप गुळ, वेलची पुड हे सर्व एकत्र करून मंद आचेवर तुपामध्ये एकजीव करून त्याचे सारण तयार करून घेणे. 5. उकळ आलेल्या पाण्यामध्ये सहा कप तांदळाचे पिठ टाकावे. व ते उकडून घ्यावे. 6. नंतर गरम असताना मळून घ्यावे. छान मळून झाल्यावर त्याचे लहान गोळे करून.. त्याची लाती करून घ्यावे. त्या मध्ये तयार केलेले सारन भरावे. 7. नंतर त्याच्या मोदकाच्या आकाराच्या पाकळ्या तयार करून छान मोदक तयार करून घ्यावे. 8. एका मोठ्या टोपात पाणी उकळून घेऊन त्याच्यावर चाळन ठेवावी.. त्यावर हळदीची किंवा केळीची पाने ठेवावी... त्याला तेल लावून त्यावर तयार झालेले मोदक ठेवावे. व त्याच्यावर झाकण ठेवावे. 9. नंतर ते 15 मिनिटे मोठ्या आचेवर वाफवून घ्यावे. अशा प्रकारे छान मऊ लुसलुशीत मोदक तयार होतात.
- Kind
- Recipe
- Place
- Ratnagiri
- Art
- Cooking (Citra-śāka-pūpa-bhakṣya-vikāra-kriyā) · Kala 42
- Contributed by
- Recorded, name withheld by the contributor
- Submitted
- 19 September 2026
- Accepted
- 19 September 2026
Evidence
This entry is record #2172 in a hash chain of 2,210. Each record commits to the one before it, so a change to any earlier record breaks every hash after it.
Record hash458190c23c0a3dd868e4836bea57c71ab82ba56214cfd2c7bd88c3d539a9b1f4
Chain head37210135be6794e3be44909721e8ba6edd638bc4286d9899c71ea90a694969c6
The chain verifies end to end as of this page load.


