bappa.org
Maharashtra Ganeshotsav Archive
2026-02156
उकडीचे मोदक ( गुलकंद)

सारण: कढई मध्ये तूप घालून त्यामध्ये गुळ घालून वितळवा. किसलेले खोबरे घालून छान परतून घ्या . शेवटी वेलची पावडर आणि गुलकंद घालून छान एकजीव करून घ्यावे .. उकड: एकवटी तांदुळाचे पीठ एका पातेल्यात ज्या वाटीने पीठ घेतले आहे त्याच वाटीने दीड वाटी पाणी उकळून घ्यावे ...पाण्याला उकळी आल्यानंतर त्यात पीठ घालून छान एकजीव करून घ्यावे आणि 10 मिनिट झाकून ठेवावे.. त्यानंतर थोडे थोडे पीठ घेऊन हाताला तेल लावून चांगले मळून छोटे छोटे गोळे करून पारी बनवावी ..आणि मोदक ला आकार द्यावे .. आणि बनवलेले मोदक उकडायला ठेवावे... उकड 15 मिनिट घ्यावी .. उकडीचे मोदक तयार
- Kind
- Recipe
- Place
- Ratnagiri
- Art
- Cooking (Citra-śāka-pūpa-bhakṣya-vikāra-kriyā) · Kala 42
- Contributed by
- Recorded, name withheld by the contributor
- Submitted
- 19 September 2026
- Accepted
- 19 September 2026
Evidence
This entry is record #2166 in a hash chain of 2,192. Each record commits to the one before it, so a change to any earlier record breaks every hash after it.
Record hash7e085519185e58f5efcca5b6e6d7976388f7f2836ce51aa11021caba942060b7
Chain headc177017a27c43917e0b9cad1ed12483a1a6aacdc9448a38bcf4cb51bbf80977b
The chain verifies end to end as of this page load.


