bappa.org
Maharashtra Ganeshotsav Archive
2026-02153
एकत्र कुटुंब

बाप्पा घरी येणार म्हटल्यावर जल्लोष, मजा, मस्ती, प्रसाद, आरत्या हे सर्व आलं आणि ते 5 दिवस म्हणजे आपण एका वेगळ्याच दुनियेत आहोत असं वाटत आणि असं वाटण्याचं कारण म्हणजे आमची कावतकरांची भावकी. आमच्या भावकीचा सर्वांचा मिळून एकच गणपती आहे आणि त्याची सेवा सर्वजण मनोभावे करत असतात. मग त्यात मकर बनवणे. पताका लावून घर सजवणे इत्यादी सर्व गोष्टी एकत्र मिळून मजा मस्ती करत पार पाडल्या जातात. रात्रीच होणारं भजन, फुगड्या, आरत्या, एकत्रित जेवण असं सर्व काही 5 दिवस धुमधाम असतो. बाप्पा येणार म्हटल्यावर सर्व भावकीतले लोक अगदी पुणे, मुंबई, दुबई पासून आमच्या या हर्डी गावात धाव घेतात. बाप्पा येतो तो फक्त आशिर्वाद देत नाही तर सर्वांना एकत्र घेऊन येतो आमच्या नात्यात गोडवा निर्माण करतो. आमचं कुटुंब आमची भावकी अजूनही एकत्र आहे याची जाणीव होते. बाप्पा अशी आपुलकीची भावना, तुझी साथ, तुझा आशिर्वाद, तुझी कृपा आमच्या कावतकर कुटुंबियांवर कायम राहुदेत. गणपती बाप्पा मोरया.
- Kind
- Story
- Place
- Ratnagiri
- Art
- Choral Recitation (Sampāṭhya) · Kala 5
- Contributed by
- Recorded, name withheld by the contributor
- Submitted
- 19 September 2026
- Accepted
- 19 September 2026
Evidence
This entry is record #2163 in a hash chain of 2,163. Each record commits to the one before it, so a change to any earlier record breaks every hash after it.
Record hash7e1efa3090bed76e3b76939b805ba10c5c104d0fe71f75b15ac6f80fc298d8ba
Chain head7e1efa3090bed76e3b76939b805ba10c5c104d0fe71f75b15ac6f80fc298d8ba
The chain verifies end to end as of this page load.


