bappa.org
Maharashtra Ganeshotsav Archive
2026-02145
माझ्या घरातील गणपती.... !!

माझ्या घरातील गणपती बाप्पा....!! पंधरा-वीस वर्षांपूर्वी जुनी एक गोष्ट आहे जेव्हा आम्ही एका मोडकळीस आलेल्या पडक्या घरात अगदी दारिद्र्य अवस्थेमध्ये जीवन जगत होतो त्यावेळेस माझे वडील व आई गणपती समोर हात जोडून आमच्या देखत प्रार्थना करायची की हे देवा आमच्या परिस्थितीत बदल होऊ दे आम्हाला दोन वेळचं अन्न आणि राहण्यासाठी निवारा दे त्यावेळेस गरीब कुटुंब शेतकरी असल्यामुळे लहानपणापासूनच त्यावर आलेली संकट बघत आलो कधी निसर्ग छळतो तर कधी व्यापारी यादृष्टचक्रातून शेतकऱ्याची दयनीय अवस्था अनुभवत होतो पण लहान असल्यामुळे फार काही जास्त करायचे नाही त्यावर श्रद्धा म्हणा किंवा आमची मेहनत दिवसेंदिवस परिस्थिती बदलत गेली आणि सर्वकाही अगदी मनाप्रमाणे घडले आणि परिस्थितीमध्ये बदल झाला डोक्यावर मजबूत छप्पर मिळाले सर्व काही व्यवस्थित झाले परंतु ते म्हणतात ना की कुछ पाने के लिए कुछ खोना पडता है या उक्तीप्रमाणे माझे वडील दोन वर्षांपूर्वी आम्हाला सोडून या जगाचा त्यांनी निरोप घेतला परंतु त्यांनी दिलेली शिकवण संस्कार व श्रद्धा याच्या बाळावर आज आम्ही आमच्या दैनंदिन गाडा हाकलत आहोत दर वर्षी प्रमाणे या वर्षी सुद्धा मी गणपती ला माझा घरात अगदी साध्या व सोप्या पद्धतीने मांडले माझा कुटुंबातील सर्व लहान मोठे आम्ही नित्य नेमाने त्यांची एकत्र येवुन सकाळ संध्याकाळ आरती करतो त्या श्रद्धेतुन आम्हाला जिवन जगण्याची शिकवण व बळ मिळते नऊ दिवस अगदी आनंदात कधी संपतात कळतच नाही खरे दु:ख वाटते शेवटच्या दिवशी कारण गणपती विसर्जन केल्यानंतर कारण आम्हाला जगण्याचे बळ देणारा व मनाला आरती आनंद देणारा देव आमच्यातून निघून गेलेला असतो मग दोन-तीन दिवस मात्र घरात आल्यानंतर करमत नाही आणि मनाला एक वेगळीच हुरहुर लागते
- Kind
- Story
- Place
- Buldhana
- Art
- Choral Recitation (Sampāṭhya) · Kala 5
- Contributed by
- श्रीराम सरकटे
- Submitted
- 19 September 2026
- Accepted
- 19 September 2026
Evidence
This entry is record #2155 in a hash chain of 2,156. Each record commits to the one before it, so a change to any earlier record breaks every hash after it.
Record hash7bfec2bb48e5c2dd43c84023b11ad36fa6bfce03936c9ea5bcc693c586ac1938
Chain heade3412a9f3a0208565add12f69b60dd7ba220a7fb816a99bef918bb05cf096c9c
The chain verifies end to end as of this page load.


