bappa.org
Maharashtra Ganeshotsav Archive
2026-02141
Ganesh utsav ani orkeshtra ani Ganesh Mela

गणेशोत्सवातील संगीत ऑर्केस्ट्रा मेळे आणि आठवणी... डॉ सुवर्णा हुबेकर बीड: आज भाद्रपद शुद्ध चतुर्थी अर्थात गणेश चतुर्थी. आज पासून अनंत चतुर्दशी पर्यंत पार्थिव गणेशाची पूजा करण्याची परंपरा आपल्या महाराष्ट्रात आणि भारत देशात स्वातंत्र्यपूर्व काळापासून चालू आहे. आज ही पूजा परंपरा एका मोठ्या राष्ट्रीय उत्सवात बदललेली आहे. आपल्या बीड शहरात देखील काही वर्षांपूर्वी पार्थिव गणेश मूर्ती मिळण्याचे एकमेव ठिकाण म्हणजे धोंडीपुरा असे होते. पण आज धोंडीपुरा ऐवजी सिद्धिविनायक कॉम्प्लेक्स मध्ये गणेश मूर्तीची विक्री केली जाते. बीड शहरामध्ये शंकर देसाई हा एक कलाकार सुंदर पार्थिव गणेशाच्या मूर्ती करीत होता, त्याचप्रमाणे आसारामजी टाक हे देखील सुंदर गणेशाच्या मूर्ती करीत असत. बीड शहरातील स्थानिक कुंभार कलाकार देखील गणपतीच्या सुंदर मूर्ती करतात. बीड शहरामध्ये पेन येथील सुबक गणेश मूर्तीचे विक्री करण्याचा पहिला मान थेटे काकांना जातो. बीड शहरात अनेक सार्वजनिक गणेश मंडळ असून ते उत्कृष्ट देखावे सादर करतात. त्यामुळे बीड शहरवासीयांना सुंदर सुंदर देखावे पहावयास मिळतात. बीड शहरात काही वर्षांपूर्वी गणेश उत्सवाच्या काळात मिळण्याचे देखील आयोजन करण्यात येत होते. त्यामध्ये राष्ट्रीय मेळावा जय हिंद मेळा इत्यादी प्रमुख होते. बीड शहरातील अनेक मंडळाची गणपतीची प्रतिष्ठापना मिरवणूक हा एक या उत्सवातील प्रमुख आकर्षणाचा भाग आहे. त्यामध्ये लेसर शो डीजे लेझीम पथक ढोल पथक यांच्या कलेचे प्रदर्शन पाहाण्या सारखे आहे. अशा बीड शहरातील गणेश चतुर्थी गणेश प्रतिष्ठापना बद्दलच्या आपल्या आठवणी !!!! डॉ सुवर्णा हुबेकर बीड..
- Kind
- Story
- Place
- Beed
- Art
- The Art of Memory (Dhāraṇā-mātṛkā) · Kala 62
- Contributed by
- Recorded, name withheld by the contributor
- Submitted
- 19 September 2026
- Accepted
- 19 September 2026
Evidence
This entry is record #2151 in a hash chain of 2,152. Each record commits to the one before it, so a change to any earlier record breaks every hash after it.
Record hashbf87dd9c90bc2496fb8ed199ffb43a5c50b73e23000f0130b2215d3d1937834c
Chain head286dce7fdf9f9ab550a4792a0efea3e34ca691add4fd242092408826089d7622
The chain verifies end to end as of this page load.


