bappa.org
Maharashtra Ganeshotsav Archive
2026-02133
वाळूंजे (नाळे) गावचा १११ वर्षांचा गणेशोत्सव; परंपरा आणि सांस्कृतिक वारशाचा जागर

वाळूंजे (नाळे) गावचा १११ वर्षांचा गणेशोत्सव; परंपरा आणि सांस्कृतिक वारशाचा जागर वसई तालुक्यातील वाळूंजे (नाळे) गावचा गणेशोत्सव तब्बल १११ वर्षांची परंपरा जपत आजही मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. पिढ्यान्पिढ्या जपलेली श्रद्धा, भक्ती आणि सांस्कृतिक परंपरा हे या गणेशोत्सवाचे वैशिष्ट्य आहे. या उत्सवात आरती, भजन, नाटक, एकांकिका, जागरण अशा विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. गावातील आबालवृद्ध या कार्यक्रमांमध्ये उत्स्फूर्तपणे सहभागी होत असल्याने गणेशोत्सवाला विशेष रंगत येते. केवळ धार्मिक उत्सव न राहता गावच्या सांस्कृतिक एकोप्याचे आणि परंपरेचे प्रतीक म्हणून वाळूंजे (नाळे) गावचा गणेशोत्सव ओळखला जातो. १११ वर्षांपासून अखंड सुरू असलेली ही परंपरा आजच्या पिढीलाही आपल्या संस्कृतीशी जोडून ठेवत आहे. वसई तालुक्यातील जुन्या आणि पारंपरिक गणेशोत्सवांमध्ये वाळूंजे (नाळे) गावच्या गणेशोत्सवाची थोरवी आवर्जून सांगितली जाते. काळ बदलला, उत्सवाचे स्वरूप बदलले, तरी भक्ती, उत्साह आणि सांस्कृतिक परंपरा आजही तितक्याच जिवंत आहेत.
- Kind
- Story
- Place
- Palghar
- Art
- The Art of Memory (Dhāraṇā-mātṛkā) · Kala 62
- Contributed by
- Recorded, name withheld by the contributor
- Submitted
- 19 September 2026
- Accepted
- 19 September 2026
Evidence
This entry is record #2143 in a hash chain of 2,161. Each record commits to the one before it, so a change to any earlier record breaks every hash after it.
Record hashf19a76dda5b39035fe16cd959a5de1bd09b0970eb07bcfb3f5ae64a7d9e7e1df
Chain headadd8161a9bf3269de564c11a228963df27777091607b743b376d04efa1cb830b
The chain verifies end to end as of this page load.


