bappa.org
Maharashtra Ganeshotsav Archive
2026-02132
रेठरे धरण चा राजा

पेट्रोल धरण तालुका वाळवा जिल्हा सांगली येथे गावात प्रवेश करतात सर्वात जुनी परंपरा असलेले न्यू अमर गणेश मंडळ आपल्या परंपरेप्रमाणे यावर्षी देखील लालबागचा राजा असे अत्यंत सुबक छान रेखीव मूर्ती ची स्थापना करून आपले परंपरा तसेच सांस्कृतिक सणाची जोपासना करत आलेले आहेत. अत्यंत आनंदाने आणि उत्साहपूर्वक हा सण साजरा करताना निवामृत गणेश मंडळ मधील प्रत्येक सदस्य आपला जीव ओतून काम करत असतो गणपती उत्सव साजरा करण्यासाठी जसे की मुलांचे मध्ये स्पर्धा लागलेली आहे तसे प्रत्येक जण आपले काम न सांगता करत असतो. लोकमान्य टिळकांनी सुरू केलेला हा उत्सव आज खरंच खूप मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो याचा एक अभिमान वाटतो कारण उत्सव सण हेच आपल्याला आजच्या धावपळीच्या युगात आपले पण जिवंत ठेवत असे वाटते. या सणामुळे लहानांपासून अगदी वृद्ध लोकांच्या मध्ये संवाद निर्माण होतो सर्वजण एकत्र येतात सर्वजण मिळून आरती करतात इतकेच नाही तर महिलांनाही ह्या अवस्थांमध्ये खूप सारे योगदान देता येते. मंडळातील सर्व महिला एकत्र येऊन खूप उत्साहात प्रत्येक ऍक्टिव्हिटी मध्ये सहभागी होतात देवाच्या आरती असो किंवा महाप्रसादाचे जीवन असतो सर्व गोष्टी करण्यासाठी सर्व महिला तसेच मंडळातील सदस्य एकत्र येऊन सहभाग करतात. असल्याची गोष्ट म्हणजे येथे सालाबाद प्रमाणे दरवर्षी पूर्ण गावासाठी महाप्रसाद असे आयोजन केले जाते गणपती बसतात दुसऱ्या दिवशी पूजा करून महाप्रसादाचे आयोजन केले जाते आणि त्यामध्ये प्रत्येक वर्षी महापूजा साठी नवीन नवीन खाद्यपदार्थ चे आयोजन करून संपूर्ण गावासाठी महाप्रसादाचे आयोजन करतात. सर्व मंडळ एकत्र येऊन महाप्रसादाचे नियोजन अगदी उत्कृष्ट पद्धतीने पार पडतो अगदी रात्री बारा वाजले तरी पण असा कोणताही भाविक महाप्रसादापासून वंचित राहिला जात नाही सर्वांना त्याचा लाभ दिला जातो त्यानंतर पारंपरिक पद्धतीने धनगरी ओव्या चा कार्यक्रम त्याच दिवशी केला जातो आणि हा उपाय केला प्रामुख्याने महिलावर्ग वृद्ध तसेच आपले तरुण युवा वर्ग सर्व आनंदाने सहभागी होतात गावात जणू उत्सव साजरा होत असतो या काळात या सणामुळे सर्व जण एकत्र येतात आपले विसरून सणांमध्ये सहभागी होतात त्यामुळे सर्वांची मने प्रसन्न राहतात तसेच गणेश भक्ती मुळे सर्वांना आनंदमय असे वर्षातून काही दिवस येतात असे वाटते की आपण एक सुखद प्रवासात आहोत आणि हा प्रवास कधी संपू नये.
- Kind
- Story
- Place
- Sangli
- Art
- Choral Recitation (Sampāṭhya) · Kala 5
- Contributed by
- Recorded, name withheld by the contributor
- Submitted
- 19 September 2026
- Accepted
- 19 September 2026
Evidence
This entry is record #2142 in a hash chain of 2,157. Each record commits to the one before it, so a change to any earlier record breaks every hash after it.
Record hash74f36e2362555bd9e5da996d9f05baa8b74e333ba65304edcb1ce5756d8196e1
Chain head6e84a7d51c401e1b1084de0775a95ce510e0eda320d7091aa054ed8aa80e3bd3
The chain verifies end to end as of this page load.


