bappa.org
Maharashtra Ganeshotsav Archive
2026-02129
🙏🏻🌺माझ्या घरचा बाप्पा🌺🙏🏻

गणेशोत्सव हा प्रत्येक गावामध्ये, घरोघरी उत्साहाने साजरा केला जातो. तालुक्यातील कौंढर काळसूर गावामध्ये देखील ग्रामस्थांनी घरोघरी पारंपारिक पद्धतीने श्री. गणेशाची स्थापना केली आहे. जे ग्रामस्थ मुंबई, बाहेरगावी असतात ते या सणाच्या निमित्ताने आवर्जुन आपल्या गावी परत येतात आणि गणपती उत्सव आनंदाने साजरा करतात. सायंकाळी प्रत्येक घरोघरी जाऊन आरती व भजन गायले जातात, पारंपरिक नृत्य केले जाते, बाप्पाच्या आवडीचा उकडीच्या मोदकाचा नैवेद्य श्री. गणेशाच्या चरणी अर्पण केला जातो. गणेशोत्सव हा फक्त सण नसून पूर्ण कुटुंबाला एकत्र आणणारा आपुलकीचा संगम आहे . 📖 ग्रामपंचायत पिंपर, ता. गुहागर, जि. रत्नागिरी अंतर्गत प्रत्येक ग्रामस्थांनी घरोघरी पारंपारिक पद्धतीने श्री. गणेशाची स्थापना करून, गावातील कोकण संस्कृती व परंपरा यांचे जतन करून सुंदर देखावे सादर केले आहे . तसेच जे ग्रामस्थ बाहेरगावी असतात ते या सणाच्या दिवशी आवर्जुन आपल्या गावी परत येतात आणि गणपती उत्सव आनंदाने साजरा करतात. सायंकाळी प्रत्येक घरोघरी जाऊन आरती व भजन गायले जातात, पारंपरिक नृत्य केले जाते, बाप्पाच्या आवडीचा उकडीच्या मोदकाचा प्रसाद श्री. गणेशाच्या चरणी अर्पण केला जातो. कोकणातील गणेशोत्सव फक्त सण नाही, तर दुरवर पसरलेल्या संपूर्ण कुटुंबाला एका छताखाली आणणारा भक्ती आणि आपुलकीचा संगम आहे .
- Kind
- Story
- Place
- Koundhar Kalsur
- Art
- Choral Recitation (Sampāṭhya) · Kala 5
- Contributed by
- Recorded, name withheld by the contributor
- Submitted
- 19 September 2026
- Accepted
- 19 September 2026
Evidence
This entry is record #2139 in a hash chain of 2,160. Each record commits to the one before it, so a change to any earlier record breaks every hash after it.
Record hashcc616d946974c6b288bf2b23485f2402c0e51bcf418ed699a2cf97fd56882f77
Chain heade396de9c6cc73ccda6964c12f0d903172d4d019ee5a74272e4741a0c7b7f69d8
The chain verifies end to end as of this page load.


