bappa.org
Maharashtra Ganeshotsav Archive
2026-02126
पेठ येथील हिरवे घराण्यातील गणपती बाप्पा

श्रावण संपला की खऱ्या अर्थाने चाहूल लागते ती गणेशोत्सवाची. आनंदाची पर्वणी आणणारा, सारे वातावरण क्षणात अगदर बदलून टाकणारा सण..म्हणजेच गणेशोत्सव होय. माझ्या माहेरी गणपती प्रतिष्ठापणा होत नसे. परंतू सासरी ही परंपरा पूर्वांपार चालत आली आहे आणि या परंपरेचा मी कधी भाग बनले कळलेच नाही. दरवर्षी कधी एकदा बाप्पाचे आगमन होते याची आतूरता लागून राहते. बाप्पा येणार म्हणून सजावट काय करायची याचे मग मनात आराखडे आखले जात. सर्वात संस्मरणीय सजावट झाली ती 2023 साली. आजही ही सजावट मनात अगदी ताजी आहे. आमचा बाप्पा - पुस्तक बाप्पा या ही वेगळी थीम घेवून विद्येच्या या देवतेला पुस्तकांची सजावट करून वंदले होते. त्यावेळी दै. सकाळ, लोकमत, पुढारी, प्रभात, पुण्यनगरी, राष्ट्रसंचार या वर्तमानापत्रांसह झी 24 तास, टिव्हि 9 मराठी यांसारख्या न्यूज चॅनेलनेदेखील याची दखल घेतली होती. वाचनसंस्कृती जपण्यासाठी आम्ही हा केलेला छोटासा प्रयत्न आम्हाला सर्वांचीच वाहवाह मिळवून देवून गेला. माझी मुलगी आदिती हिचा उत्साह तर या दिवसांत अगदी शिगेला पोहचलेला असतो. सजावटीचे बारकावे ती अगदी निष्णांत कलाकाराप्रमाणे सांगत असते. तिच्याकडे पाहून या उत्सवाचा आनंद अगदी व्दिगुणीत होतो. ह्या उत्सवाच्या काळात घरच्या सगळ्या व्यक्तींचा अगदी उस्फुर्त पाठिंबा असतो. सगळेच जण भान हरूपन बाप्पाची येथेच्छ सेवा करतात. आमच्या कुटुंबात मागील ऑक्टोबर 2025 मध्ये एका नवीन सदस्याचे आगमन झाले. त्याचे नाव राघव. त्याने तर यावर्षी गणपती बाप्पाच्या उत्सवात चांगलीच मजा केली. त्या एवढ्याश्या लहान बाळाला घेवून बाप्पाची सजावट करणे म्हणजे खूपच जिकिरीचे काम पण आम्ही ते लिलया पार पाडले आणि तो एवढासा चिमुरडा बाप्पाच्या आगमनाने अगदी आनंदीत झाला. बाप्पा आल्यांनतर लगेचच होणारे गौरीच आगमन, त्यांचे पुजन, घरातील हळदी कुंकुं समारंभ यात बाप्पाचे दिवस कसे निघून जातात कळतच नाही. आणि मग तो दिवस उजाडतो ज्या क्षणी बाप्पाचे विसर्जन होते. मनात एक हुरहुर ... एखाद्या जवळीची व्यक्ती लांब चालली आहे आणि ती आता वर्षभरानेच भेटेल अशी खंत लागून राहते. परंतू वर्षभराने नव्या उमेदीने ... नव्या जोषात बाप्पाचे परत आगमन होते. परत एक वेगळाच जोष आणि जल्लोषपूर्ण वातावरणात पुन्हा बाप्पाचे स्वागत केले जाते. - ॲड. रूपाली जयदीप हिरवे पेठ, ता.आंबेगाव, जि.पुणे 410512 मो.नं. - 9766405125 / 9096276483
- Kind
- Story
- Place
- Pune
- Art
- Arranging a Chamber (Śayana-racanā) · Kala 41
- Contributed by
- Recorded, name withheld by the contributor
- Submitted
- 19 September 2026
- Accepted
- 19 September 2026
Evidence
This entry is record #2136 in a hash chain of 2,148. Each record commits to the one before it, so a change to any earlier record breaks every hash after it.
Record hash45b7fc349b32f327381fc213719cf5900761eae185bf71e1dfe86e155bce2046
Chain headfbe49f9d597f88b058609f6d5d80d42fe850dcd1a2dbbec60aa75e9201a56615
The chain verifies end to end as of this page load.


