bappa.org
Maharashtra Ganeshotsav Archive
2026-02121
पेशवेकालीन इतिहासाची साक्ष देणारे वसईतील गणपती मंदिर

पेशवेकालीन इतिहासाची साक्ष देणारे वसई पश्चिमेकडील रमेदी येथील गणपती मंदिर वसई तालुक्यात अनेक ठिकाणी इतिहासाच्या पाऊलखुणा आपल्याला बघायला मिळतात. त्यातील काही ऐतिहासिक स्थळांपैकी वसईमधील रमेदी येथे पेशवेकालीन श्री सिद्धिविनायक मंदिर मात्र सुस्थितीत आहे. या मंदिराला 155 वर्षांपूर्वी मुंबईचे ब्रिटिश गव्हर्नर यांनी ७२ रुपये आणि हनुमान मंदिराला १९ रुपयांची सनद दिल्याचा मोडी आणि इंग्रजी भाषेतील मजकूर असलेली सनद मंदिराचे पुजारी नारायण केशव फडके यांच्याकडे जपून ठेवण्यात आली आहे. वसईच्या पेशवेकालीन इतिहासाची साक्ष हे गणपती मंदिर 'श्री सिद्धिविनायक गणेश' स्थळ रमेदी धोवली या नावानेच परिचित आहे. खाजगी मालकीच्या अंतर्गत जपलेले व सुस्थितीत असणारे हे पेशवेकालीन श्री गणेशाचे मंदिर पुजारी नारायण केशव फडके (नाना) व फडके कुटुंबीयांनी उत्तम रीतीने सांभाळले आहे. सध्या या ठिकाणी फडके कुटुंबीयांची पाचवी पिढी कार्यरत आहे. यात विशेष म्हणजे फडके कुटुंबीयांकडे मोडी लिपीत असणाऱ्या श्री गणपती व श्री हनुमान देवस्थानाची इ.स १८६७ सालची सनद जपून ठेवण्यात आली आहे. यावर १० सप्टेंबर १८६७ अशी इंग्रजीतून तिथि नमूद आहे. या सनदेचे एक वेगळेपण म्हणजे यात एकाच पानावर एका बाजूस मोडी लिपीतील मजकूर व दुसऱ्या बाजूस इंग्रजी लिपीतील मजकूर लिहिण्यात आलेला आहे. या मंदिराला दररोज अनेक भाविक भेट देत असतात. माघी गणेशोत्सवाला मंदिरात ५ दिवसीय उत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. या उत्सवाला मोठ्या संख्येने भक्तगण उपस्थित राहून श्री गणेशाचे दर्शन घेतात. फडके कुटुंबियांकडून उत्तमरीत्या या उत्सवाचे नियोजन करण्यात येते.
- Kind
- Story
- Place
- Palghar
- Art
- Architecture (Vāstu-vidyā) · Kala 29
- Contributed by
- Recorded, name withheld by the contributor
- Submitted
- 19 September 2026
- Accepted
- 19 September 2026
Evidence
This entry is record #2131 in a hash chain of 2,131. Each record commits to the one before it, so a change to any earlier record breaks every hash after it.
Record hash45dc7b0d02b66622344e1065d65b039042aeda9aba65e589f73cc3840ec6f65e
Chain head45dc7b0d02b66622344e1065d65b039042aeda9aba65e589f73cc3840ec6f65e
The chain verifies end to end as of this page load.


