bappa.org
Maharashtra Ganeshotsav Archive
2026-02118
मानाच्या कसबा गणपतीचा थाटच न्यारा सोन्नलगी ते सोलापूर पर्यंतचा रंजक प्रवास

मानाच्या कसबा गणपतीचा थाटच न्यारा सोन्नलगी ते सोलापूर पर्यंतचा रंजक प्रवास सोलापूर : उत्तर कसबा येथील श्रीमंत मानाचा कसबा गणपतीचा थाटच न्यारा आहे. या मंडळाकडून गेल्या ७८ वर्षापासून समृद्ध परंपरेची जोपासना केली जात आहे. स्वातंत्र्यापूर्वी स्थापन झालेल्या शहरातील प्रमुख मंडळांपैकी एक असलेल्या या मंडळची स्थापना १९४२ साली झाली. सोन्नलगी ते सोलापूर पर्यंतचा मंडळाचा प्रवास रंजक आहे. स्वातंत्र्योत्तर तत्कालीन बाळी गांव व सीमावर्ती भागातील गणेश भक्तांनी या मंडळाची स्थापना केली. बाळी गावातील मुख्यतः सधन शेतकऱ्याच्या पुढाकाराने गाडीखाना चौक येथे छोट्याशा मंडपात गणरायाची स्थापना झाली. स्वातंत्र्यानंतर महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र प्रदेश या भागाचा वेगाने विस्तार झाला. १६ छोट्या गावांच्या एकत्रिकरणातून बनलेल्या सोलापूर शहराचा मध्यवर्ती भाग म्हणून उदयास असलेल्या बाळीवेसेत धावत्या बदलत्या युगात ओघाने अनेक बदल झाले. प्रारंभी उत्सव काळापुरते या मंडळाने १९८६ साली कायमस्वरुपी 'श्रीं' ची प्रतिष्ठापना करण्याचा निर्णय घेतला. त्यावेळी मूर्तिकार दीक्षित यांच्याकडून आकर्षक, लक्षवेधी मूर्ती साकारण्यात आली. या मूर्तीची खासियत म्हणजे शिरस्थानी अर्थात डोक्यावर लिंगाची प्रतिकृती आहे. गळ्यात लिंग धारण केलेल्या बाप्पाच्या पोटावर नागदेवता विराजमान आहेत. आकर्षक सजावटीची संकल्पना रुजू केल्यानंतर मंडळाने १९९१ पासून पौराणिक घटनेवर आधारित हलत्या मूर्तीचा देखावा सादर करण्यास सुरुवात केली. पौराणिक संकल्पनेवर आधारित या नाविन्यपूर्ण प्रयोगाने सोलापूरकरांची मने जिंकली. आत्तापर्यंत अखंडपणे पौराणिक, ऐतिहासिक घटनांवर आधारित देखावा सादर करणारे सोलापूरातील हे एकमेव मंडळ ठरले आहे. आत्तापर्यंत या मंडळाने शिशुपालचा वध, श्रीराम राज्याभिषेक, इंद्र दरबार, नाग देवतेचची शिवपूजा, शिवराज्याभिषेक, भक्त हनुमान, बाहुबली मुर्तीस अभिषेक, राम-लक्ष्मण, नाग पाशमुक्ती असे विविध देखावे सादर झाले आहेत. याशिवाय वैष्णोदेवी दर्शन देखाव्याने प्रत्यक्ष दर्शनाचा परमोच्च आनंदाचा क्षण सोलापूरातील गणेशभक्तांनी अनुभवला आहे. २००७ मध्ये गणेश जयंतीच्या मुहूर्तावर या मंडळाच्या 'श्रीं' ची मंगलभवनात प्रतिष्ठापना करण्यात आली. २००७ मध्ये लेझीमऐवजी झेंडा पथकाच्या आकर्षक खेळीचा प्रयोग सादर करण्यात आला. या मंडळाच्या प्रतिष्ठानेतर्फे दरवर्षी प्रगतिशील
- Kind
- Story
- Place
- Solapur
- Art
- Staging Plays and Tales (Nāṭikākhyāyikā-darśana) · Kala 9
- Contributed by
- Recorded, name withheld by the contributor
- Submitted
- 19 September 2026
- Accepted
- 19 September 2026
Evidence
This entry is record #2128 in a hash chain of 2,142. Each record commits to the one before it, so a change to any earlier record breaks every hash after it.
Record hash2ee2005fea6413b0e80a18dac8c2423520a6bdc99d4258393c312eed6db4607b
Chain head74f36e2362555bd9e5da996d9f05baa8b74e333ba65304edcb1ce5756d8196e1
The chain verifies end to end as of this page load.


