bappa.org
Maharashtra Ganeshotsav Archive
2026-02116
गोड भात (साखर भात)
तांदूळ शिजवून घेणे: बासमती तांदूळ धुऊन अर्धा तास भिजत ठेवा. एका पातेल्यात पाणी उकळवून त्यात तांदूळ मोकळा आणि मऊ शिजवून घ्या (भात पूर्ण गाळ होऊ देऊ नका, मऊ पण दाणा मोकळा राहिला पाहिजे सुका मेवा परतून घेणे: एका कढईत साजूक तूप गरम करा. त्यात काजू, बदाम आणि बेदाणे हलके सोनेरी होईपर्यंत परतून बाजूला काढून घ्या. फोडणी देणे: त्याच तुपात लवंग, दालचिनी आणि वेलदोडा घाला. साखर/गूळ आणि भात एकत्र करणे: आता कढईत शिजवलेला भात आणि साखर (किंवा किसलेला गूळ) घालून हलक्या हाताने सर्व मिश्रण नीट एकत्र करा. वाफेवर शिजवणे: कढईवर झाकण ठेवा आणि मंद आचेवर ५ ते ७ मिनिटे वाफ येऊ द्या, जेणेकरून साखर किंवा गूळ पूर्णपणे विरघळेल आणि भातामध्ये मुरेल. Sर्व्ह करणे: वरून तूप आणि परतून घेतलेला सुका मेवा घालून गरमागरम किंवा थंड झालेला मोकळा गोड भात सर्व्ह करा.
- Kind
- Recipe
- Place
- Mumbai Suburban
- Art
- Cooking (Citra-śāka-pūpa-bhakṣya-vikāra-kriyā) · Kala 42
- Contributed by
- Recorded, name withheld by the contributor
- Submitted
- 19 September 2026
- Accepted
- 19 September 2026
Evidence
This entry is record #2126 in a hash chain of 2,127. Each record commits to the one before it, so a change to any earlier record breaks every hash after it.
Record hash763446f7d02c2cb6c2552b67fc3b3d3c5577101fa6e8cbc3735baec9bb3eaeed
Chain head9b3a161f6ff5a4529e2d29437eeafb4c550e39c573c4a8cd40d67b1378df70eb
The chain verifies end to end as of this page load.


