bappa.org
Maharashtra Ganeshotsav Archive
2026-02115
आशीर्वाद

नमस्कार मी रविकांत कांबळे मला लहान असल्या पासून गौरी गणपती ची आवड आहे माझ्या घरा मध्ये गणपती बसवायची परंपरा नव्हती मग मी माझ्या आजोबा श्री रंगनाथ कांबळे यांच्या कडे हट्ट केला की घरा मध्ये गणपती बसवायचं पण आजोबांचा व घरच्या सर्व मंडळीचा विरोध होता व आमच्या घरात गौरी लक्ष्मी होती पण गणपती बसवत नव्हते खुप वाईट वाटत होतं मग मी परत हट्ट खुप केला त्यानंतर सगळयांनी व आजोबांनी छोटा गणपती आणुन दिला ही गोष्ट कमीत कमी 25 ते 30 वर्षा खाली घडलेली आहे पण मी आजोबांचा खुप खुप आभारी आहे त्यांनी मला खुप सपोर्ट केलं आणि गणपती बाप्पा ची कांबळे घरात स्थापना झाली आणि तेव्हा पासून ही परंपरा आम्ही चालू ठेवली मी लहान पणी तशी आमची परिस्तिथी खुप नाजूक असताना देखील माझी आई नी सुद्धा आजोबां गेल्यावर खुप सपोर्ट केला आणि आम्ही देवाचे खुप आभारी आहोत की आम्हाला प्रत्येक वर्षी कधी कोणती गोष्ट कमी पडली नाही बस फक्त बाप्पाला एकच विनंती आहे माझ्या भारत देशात सगळे जनता खुश आंनदी आरोग्य दाई राहो धन्यवाद गणपती बाप्पा मोरया
- Kind
- Story
- Place
- Solapur
- Art
- The Art of Memory (Dhāraṇā-mātṛkā) · Kala 62
- Contributed by
- Recorded, name withheld by the contributor
- Submitted
- 19 September 2026
- Accepted
- 19 September 2026
Evidence
This entry is record #2125 in a hash chain of 2,141. Each record commits to the one before it, so a change to any earlier record breaks every hash after it.
Record hash8c42f74008f1203185d239cd7deec5e01ac90d2cafb0849cc67c7d9f8b290356
Chain head61d201b9466934b9edd855462ec9b1bf8ecde2131df06403a198bb0a75e5aa80
The chain verifies end to end as of this page load.


