bappa.org
Maharashtra Ganeshotsav Archive
2026-02114
रावण गर्वहरण

लंकानगरीचा राजा रावण महादेवांचा परमभक्त होता, पण त्याला आपल्या शक्तीचा प्रचंड अहंकार होता. महादेवांनी कायम आपल्या जवळ राहावे म्हणून त्याने संपूर्ण कैलाश पर्वतच लंकानगरीत नेण्याचा निश्चय केला आणि थेट कैलाश पर्वत उचलला. रावणाचा अहंकार दूर करण्यासाठी महादेवाने केवळ आपल्या पायाच्या अंगठ्याने पर्वतावर लीलया भार टाकला. रावणाचा हात कैलाश पर्वताखाली दाबला गेला आणि त्याला प्रचंड पीडा होऊ लागली, ज्यामुळे त्याचा अहंकार क्षणात नष्ट झाला. शेवटी महादेवाला प्रसन्न करण्यासाठी व त्यांची करुणा भाकण्यासाठी रावणाने शिवतांडव स्तोत्र रचून ते गायले.
- Kind
- Story
- Place
- Thane
- Art
- Staging Plays and Tales (Nāṭikākhyāyikā-darśana) · Kala 9
- Contributed by
- Recorded, name withheld by the contributor
- Submitted
- 19 September 2026
- Accepted
- 19 September 2026
Evidence
This entry is record #2124 in a hash chain of 2,127. Each record commits to the one before it, so a change to any earlier record breaks every hash after it.
Record hashd977b40f00189ef267fd0096c888ef14f30d3bb4395af8c92020d77bfad870dc
Chain head9b3a161f6ff5a4529e2d29437eeafb4c550e39c573c4a8cd40d67b1378df70eb
The chain verifies end to end as of this page load.


