bappa.org
Maharashtra Ganeshotsav Archive
2026-02112
✨ पिंपर गावचा गणेशोत्सव....

ग्रामपंचायत पिंपर, ता. गुहागर, जि. रत्नागिरी अंतर्गत प्रत्येक ग्रामस्थांनी घरोघरी पारंपारिक पद्धतीने श्री. गणेशाची स्थापना करून, गावातील कोकण संस्कृती व परंपरा यांचे जतन करून सुंदर देखावे सादर केले आहे . तसेच जे ग्रामस्थ बाहेरगावी असतात ते या सणाच्या दिवशी आवर्जुन आपल्या गावी परत येतात आणि गणपती उत्सव आनंदाने साजरा करतात. सायंकाळी प्रत्येक घरोघरी जाऊन आरती व भजन गायले जातात, पारंपरिक नृत्य केले जाते, बाप्पाच्या आवडीचा उकडीच्या मोदकाचा प्रसाद श्री. गणेशाच्या चरणी अर्पण केला जातो. कोकणातील गणेशोत्सव फक्त सण नाही, तर दुरवर पसरलेल्या संपूर्ण कुटुंबाला एका छताखाली आणणारा भक्ती आणि आपुलकीचा संगम आहे .
- Kind
- Story
- Place
- Ratnagiri
- Art
- Choral Recitation (Sampāṭhya) · Kala 5
- Contributed by
- Recorded, name withheld by the contributor
- Submitted
- 19 September 2026
- Accepted
- 19 September 2026
Evidence
This entry is record #2122 in a hash chain of 2,143. Each record commits to the one before it, so a change to any earlier record breaks every hash after it.
Record hash8930074640ce1eaf88e4f82386b2329fd7fb3808ca625ae4340bca0ac925e10b
Chain headf19a76dda5b39035fe16cd959a5de1bd09b0970eb07bcfb3f5ae64a7d9e7e1df
The chain verifies end to end as of this page load.


