bappa.org
Maharashtra Ganeshotsav Archive
2026-02111
गणेशोत्सव व ढोलपथक एक अतूट nate
गणेशोत्सव आणि ढोलपथक — वर्णन गणेशोत्सव हा महाराष्ट्रातील अत्यंत उत्साहाने साजरा केला जाणारा सण आहे. गणेशोत्सवाच्या काळात सर्वत्र आनंदाचे आणि भक्तीचे वातावरण निर्माण होते. घराघरात तसेच सार्वजनिक मंडळांमध्ये श्री गणेशाची सुंदर मूर्ती प्रतिष्ठापित केली जाते. गणपती बाप्पाच्या आगमनाच्या वेळी ढोलपथकाचे वादन वातावरणात उत्साह निर्माण करते. ढोल-ताशांचा कडकडाट, पारंपरिक वेशभूषा आणि तालबद्ध वादन यामुळे मिरवणुकीला विशेष रंगत येते. ढोलपथकातील तरुण-तरुणी एकसुरात आणि शिस्तबद्ध पद्धतीने ढोल वाजवताना दिसतात. त्यांच्या वादनावर उपस्थित नागरिक उत्साहाने नाचतात आणि “गणपती बाप्पा मोरया!” असा जयघोष करतात. ढोलपथक ही महाराष्ट्राच्या समृद्ध लोकपरंपरेची ओळख आहे. गणेशोत्सवामुळे समाजातील लोक एकत्र येतात आणि आनंद, एकता व बंधुभावाचा संदेश मिळतो. त्यामुळे गणेशोत्सव आणि ढोलपथक यांचे नाते अतूट आहे.
- Kind
- Story
- Place
- Thane
- Art
- Instrumental Music (Vādyam) · Kala 2
- Contributed by
- प्रणित बबन डांगे
- Submitted
- 19 September 2026
- Accepted
- 19 September 2026
Evidence
This entry is record #2121 in a hash chain of 2,121. Each record commits to the one before it, so a change to any earlier record breaks every hash after it.
Record hash87aa6361d1a8161c919d5b5bc79de3aa5cd289a37429183c776e1b6ae42bf5fa
Chain head87aa6361d1a8161c919d5b5bc79de3aa5cd289a37429183c776e1b6ae42bf5fa
The chain verifies end to end as of this page load.


