bappa.org
Maharashtra Ganeshotsav Archive
2026-02102
सोलापुरी चादरीची परंपरा – आपल्या घराचा वारसा
सोलापूरची ओळख असलेल्या सोलापुरी चादरी ही केवळ वापरण्याची वस्तू नसून आपल्या शहराच्या कष्टकरी आणि कलात्मक परंपरेचे प्रतीक आहे. पूर्वीपासून सोलापूरमधील अनेक कुटुंबे हातमाग व विणकामाच्या व्यवसायाशी जोडलेली आहेत. रंगीबेरंगी नक्षी, पारंपरिक डिझाइन आणि मजबूत कापड ही सोलापुरी चादरीची वैशिष्ट्ये आहेत. घरातील मोठ्यांकडून या चादरींचे महत्त्व, त्यांची काळजी आणि त्यामागची मेहनत याबद्दल ऐकायला मिळते. लग्नसमारंभ, सण आणि पाहुण्यांच्या स्वागतामध्ये सोलापुरी चादरीला विशेष स्थान आहे. बदलत्या काळात नवीन डिझाइन आणि तंत्रज्ञान आले तरी या परंपरेचे महत्त्व आजही कायम आहे. सोलापुरी चादर म्हणजे आमच्यासाठी सोलापूरच्या कष्ट, कौशल्य आणि संस्कृतीची आठवण आहे. ही परंपरा पुढच्या पिढीपर्यंत जपली आणि पोहोचवली पाहिजे, कारण यात आपल्या शहराचा इतिहास आणि असंख्य कारागिरांचे श्रम दडलेले आहेत.
- Kind
- Story
- Place
- Solapur
- Art
- Spinning (Tarku-karma) · Kala 34
- Contributed by
- Recorded, name withheld by the contributor
- Submitted
- 19 September 2026
- Accepted
- 19 September 2026
Evidence
This entry is record #2112 in a hash chain of 2,114. Each record commits to the one before it, so a change to any earlier record breaks every hash after it.
Record hashbee63ef23aa29df6f186b09649d1dcca11744ae71f89b63c24ab9dce1b585673
Chain head0edf0c44b2c189fd216662876e52988f0341084fa77120e62438e01d4c00e0e6
The chain verifies end to end as of this page load.


