bappa.org
Maharashtra Ganeshotsav Archive
2026-02099
आमचा बाप्पा

गणपती पूजेसाठी वापरण्यात येणारी २१ पत्री आणि फळे आपल्याला निसर्गाचे जतन करण्याचा, पर्यावरणाचे रक्षण करण्याचा आणि आरोग्याची काळजी घेण्याचा संदेश देतात. अशा औषधी वनस्पती व फळांची माहिती पुढच्या पिढीला व्हावी हा हेतू आहे. गणपती बाप्पाला 'गजमुख' (हत्तीचे तोंड असलेले) म्हटले जाते. निसर्गात हत्तीला फळे आणि वनस्पती खूप प्रिय असतात. बाप्पाच्या पूजेत फळांना नैवेद्य म्हणून खूप महत्त्व आहे.आरोग्य आणि समृद्धीचे प्रतीक फळे हे निसर्गाचे पूर्ण अन्न आणि गोड मानले जातात. ती अर्पण करून आपण निसर्गाचे आभार मानतो. गणेशोत्सवात डाळिंब, केळी, पेरू, सफरचंद यांसारखी हंगामी फळे ठेवली जातात. ही फळे पावसाळ्याच्या दिवसांत शरीराला आवश्यक असणारी जीवनसत्त्वे देतात. बाप्पाला मोदकासोबतच विविध फळांचा नैवेद्य दाखवल्याने घरात अन्नाची आणि धान्याची कमतरता भासत नाही, अशी धार्मिक धारणा आहे.
- Kind
- Story
- Place
- Ratnagiri
- Art
- Horticulture (Vṛkṣāyurveda-yoga) · Kala 53
- Contributed by
- Recorded, name withheld by the contributor
- Submitted
- 19 September 2026
- Accepted
- 19 September 2026
Evidence
This entry is record #2109 in a hash chain of 2,130. Each record commits to the one before it, so a change to any earlier record breaks every hash after it.
Record hashd59e408954b9ce7e2dabd032d3dfce00ce4d2790a780ef8323bda611dbf6bb04
Chain head780128c83ab18256f1fa1cf77fd76ada1716e3fdd533ae5c194f66dd4cd37ad6
The chain verifies end to end as of this page load.


