bappa.org
Maharashtra Ganeshotsav Archive
2026-02094
गणेशोत्सव संस्कृती, परंपरा आणि पर्यावरणाचा संदेश
१०९ वर्षांची परंपरा जपणारा प्रफुल्ल पाटील कुटुंबाचा गणेशोत्सव वसईतील प्रफुल्ल पाटील यांच्या घरी गेल्या १०९ वर्षांपासून गणेशोत्सवाची अखंड परंपरा जपली जात आहे. या उत्सवाचे विशेष वैशिष्ट्य म्हणजे गेल्या १०९ वर्षांपासून बाल गणेशमूर्तीचीच प्रतिष्ठापना केली जाते. वर्षानुवर्षे मूर्तीच्या स्वरूपात कोणताही बदल न करता ही परंपरा आजही तितक्याच श्रद्धेने आणि उत्साहाने सुरू आहे. या गणेशोत्सवाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे दरवर्षी सादर केले जाणारे चलचित्र देखावे. केवळ मनोरंजन हा उद्देश न ठेवता या देखाव्यांच्या माध्यमातून सामाजिक विषयांवर जनजागृती आणि लोकप्रबोधन केले जाते. यावर्षीच्या देखाव्यात “Eco-Friendly वसई-विरार” ही संकल्पना साकारण्यात आली आहे. पर्यावरण संवर्धनाचा संदेश देतानाच वसई-विरारचा भौगोलिक परिसर, स्थानिक वैशिष्ट्ये आणि सांस्कृतिक परंपरा देखाव्याच्या माध्यमातून सुंदर पद्धतीने मांडण्यात आली आहे. १०९ वर्षांची श्रद्धा, परंपरा आणि सामाजिक प्रबोधनाची वाटचाल जपत प्रफुल्ल पाटील यांच्या कुटुंबाचा हा गणेशोत्सव वसईच्या सांस्कृतिक वारशाचा एक सुंदर ठेवा ठरला आहे.
- Kind
- Story
- Place
- Palghar
- Art
- Costume and Stagecraft (Nepathya-yoga) · Kala 11
- Contributed by
- Recorded, name withheld by the contributor
- Submitted
- 19 September 2026
- Accepted
- 19 September 2026
Evidence
This entry is record #2104 in a hash chain of 2,107. Each record commits to the one before it, so a change to any earlier record breaks every hash after it.
Record hash9c05d8f7d742f29439215c714b38f60c0c477e67178a6511552ad97a9e7f67f4
Chain head02ad373d0c43254566cff6d190538475d701e34521aadbb214fa490919c5ef87
The chain verifies end to end as of this page load.


