bappa.org
Maharashtra Ganeshotsav Archive
2026-02093
२२ वर्षांच्या वारीची प्रेरणा गणेश सजावटीत; कुरुंदवाडच्या चव्हाण कुटुंबाचा अनोखा उपक्रम

गेल्या २२ वर्षांपासून अखंड पंढरपूरची पायी वारी करण्याची परंपरा जपणाऱ्या चव्हाण कुटुंबीयांनी यंदा हीच विठ्ठलभक्ती गणेशोत्सवाच्या अनोख्या सजावटीतून साकारली आहे. कुरुंदवाड येथील सुरेश आण्णाप्पा चव्हाण हे गेल्या २२ वर्षांपासून विठुरायाच्या दर्शनासाठी पायी वारी करत आहेत. त्यांची हीच भक्ती आणि सेवाभावाचा वारसा त्यांचे पुत्र तुषार सुरेश चव्हाण यांनीही जपला आहे. तुषार हे गेल्या नऊ वर्षांपासून तरडगाव येथे पंढरपूरकडे पायी जाणाऱ्या वारकऱ्यांना प्रसाद वाटप करून वारकरी सेवेत योगदान देत आहेत. यंदाच्या गणेशोत्सवात चव्हाण कुटुंबीयांनीऩेहू-आळंदीपासून पंढरपूरपर्यंतचा वारकरी संप्रदायाचा प्रवाऩा' भव्य दखावा साकारला आहे. संतांच्या भूमीतून सुरू होणारी वारी, टाळ-मृदंगाचा गजर, विठ्ठलनामाचा जयघोष आणि पंढरीच्या दिशेने निघालेल्या वारकऱ्यांची भक्तिमय वाटचाल या देखाव्यातून हुबेहूब साकारण्यात आली आहे.भक्ती, संस्कृती आणि वारकरी परंपरेचा सुंदर संगम असलेला हा देखावा गणेशोत्सवात भाविकांचे विशेष लक्ष वेधून घेत असून, विठ्ठलभक्तीसाठी प्रेरणादायी ठरत आहे.
- Kind
- Story
- Place
- Kolhapur
- Art
- Costume and Stagecraft (Nepathya-yoga) · Kala 11
- Contributed by
- Recorded, name withheld by the contributor
- Submitted
- 19 September 2026
- Accepted
- 19 September 2026
Evidence
This entry is record #2103 in a hash chain of 2,103. Each record commits to the one before it, so a change to any earlier record breaks every hash after it.
Record hashbc52f381b66d33bf5b9b69aeb2ca3f261d115ce476b6f78d5cc54e7628cb064e
Chain headbc52f381b66d33bf5b9b69aeb2ca3f261d115ce476b6f78d5cc54e7628cb064e
The chain verifies end to end as of this page load.


