bappa.org
Maharashtra Ganeshotsav Archive
2026-02086
श्री गौरी गणपतीचा उत्सव!🙏🌹🌹🌹

श्रद्धा व परंपरा यांचा सुरेख संगम असलेला गौरी- गणपतीचा उत्सव संपूर्ण भारत देशांमध्ये अत्यंत उत्साहाने व मनोभावे साजरा केला जातो. विद्येची देवता असलेला श्री गणेश व समृद्धीची प्रतीके असलेल्या गौरी यांचे आगमन झाल्यानंतर घराघरात आनंद ओसंडून वाहत असतो. सत्य,अहिंसा, प्रामाणिकपणा, सदाचार, सुविचार, एकात्मता यांची प्रतिक्रिया असलेले हे सण समारंभ ही आपल्या देशाची ओळख आहे. आपण सर्व भारतीय नागरिकांनी एकमेकांशी प्रेमाने, सामंजस्याने, सत्याने, एकमेकांशी सलोखा ठेवून राहणे आवश्यक आहे. 'एकमेका साह्य करू अवघे धरू सुपंथ! 'या न्यायाने आपण सर्वांनी वागून या सणसमारंभाची पवित्र गोळी कायम ठेवूया! गणपती बाप्पा मोरया! जय गौरी जय लक्ष्मी! 🙏🙏🙏🌹🌹🌹
- Kind
- Story
- Place
- वांगीकर नगर, पंढरपूर
- Art
- Rules of Discipline (Vainayikī vidyā) · Kala 63
- Contributed by
- Recorded, name withheld by the contributor
- Submitted
- 19 September 2026
- Accepted
- 19 September 2026
Evidence
This entry is record #2096 in a hash chain of 2,096. Each record commits to the one before it, so a change to any earlier record breaks every hash after it.
Record hash768d43d1a03d3696a95d6236ef8eb60b9493a620888532d152a536db370a3b9e
Chain head768d43d1a03d3696a95d6236ef8eb60b9493a620888532d152a536db370a3b9e
The chain verifies end to end as of this page load.


