bappa.org
Maharashtra Ganeshotsav Archive
2026-02081
सामाजिक उपक्रम

*हरि ओम व्हॅली, टिटवाळा येथे टाळ-मृदुंगाच्या गजरात गणेशबाप्पाचे स्वागत* टिटवाळा : “सोसायटी नव्हे, एक कुटुंब” हे ब्रीदवाक्य घेऊन सामाजिक, सांस्कृतिक आणि पर्यावरणपूरक उपक्रमांची परंपरा जपत हरि ओम व्हॅली गणेशोत्सव मंडळाचा २० वा गणेशोत्सव मोठ्या आनंदात, उत्साहात आणि भक्तिभावाने साजरा होत आहे. हरि ओम व्हॅली गणेशोत्सव मंडळाकडून गेल्या अनेक वर्षांपासून गणेशोत्सवाच्या माध्यमातून धार्मिक कार्यक्रमांसोबतच विविध सामाजिक आणि जनजागृतीपर उपक्रम राबविले जात आहेत. यंदाच्या वर्षी मंडळाने “पाणी आडवा, पाणी जिरवा” हा महत्त्वपूर्ण पर्यावरणपूरक उपक्रम गृहसंकुलात राबवून जलसंधारणाचा संदेश दिला आहे. गेल्या काही वर्षांतील मंडळाच्या सामाजिक कार्यामध्ये नाम फाउंडेशनला ₹२५,००० ची मदत, सांगली येथे जाऊन पूरग्रस्तांना वस्तुरूपात थेट मदत, कापडी पिशव्यांचे वाटप, आरोग्य शिबिर, रक्तदान शिबिर, वक्तृत्व स्पर्धा, सुंदर हस्ताक्षर मार्गदर्शन, विविध क्रीडा प्रकारांबाबत मार्गदर्शन, आरोग्य विम्याबाबत जनजागृती अशा अनेक उपक्रमांचा समावेश आहे. लहान मुलांसाठी टीव्ही कलाकार तसेच प्रसिद्ध जादूगार अभिजित यांच्या जादूच्या प्रयोगांचे आयोजन करण्यात आलेले होते. तसेच कु. नेहा केणे हिच्या गणेशगीतांमधून आणि देशभक्तिपर गिते ,महिलांसाठी हळदी-कुंकू समारंभाचेही आयोजन करण्यात येते. गणेशोत्सवाच्या काळात विविध सांस्कृतिक व क्रीडा स्पर्धांचे आयोजन करून मुलांना प्रोत्साहन दिले जाते. सहभागी तसेच विजेत्या मुलांना मेडल आणि प्रमाणपत्रे देऊन त्यांच्या कलागुणांना प्रोत्साहन दिले जाते. सत्यनारायण पूजेच्या निमित्ताने महाप्रसाद/भंडाऱ्याचे आयोजन करण्यात आले असून, गणेशोत्सव काळात टिटवाळा तसेच पंचक्रोशीतील विविध भजनी मंडळांकडून सांप्रदायिक भजनाचे आयोजन करण्यात आले आहे. त्यामुळे हरि ओम व्हॅली परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण झाले आहे. गणपती बाप्पाच्या दर्शनासाठी टिटवाळा, कल्याण तसेच परिसरातील विविध क्षेत्रांतील मान्यवर आणि प्रमुख पाहुणे हरि ओम व्हॅलीला भेट देत आहेत. मंडळाच्या सातत्यपूर्ण सामाजिक, सांस्कृतिक आणि पर्यावरणपूरक कार्याची दखल घेत मंडळाला विविध पुरस्कारांनीही गौरविण्यात आले आहे. गेल्या २० वर्षांची ही वाटचाल केवळ गणेशोत्सव साजरा करण्यापुरती मर्यादित न राहता सामाजिक बांधिलकी, पर्यावरण संवर्धन, संस्कृती आणि एकोपा जपणारी ठरली आहे
- Kind
- Tradition
- Place
- Thane
- Art
- Rules of Discipline (Vainayikī vidyā) · Kala 63
- Contributed by
- Recorded, name withheld by the contributor
- Submitted
- 19 September 2026
- Accepted
- 19 September 2026
Evidence
This entry is record #2091 in a hash chain of 2,136. Each record commits to the one before it, so a change to any earlier record breaks every hash after it.
Record hash60dee6a078b9091afd853901ec337c970594428833e9e4fd07dadd2ae403e8ce
Chain head45b7fc349b32f327381fc213719cf5900761eae185bf71e1dfe86e155bce2046
The chain verifies end to end as of this page load.


