bappa.org
Maharashtra Ganeshotsav Archive
2026-02076
अंधश्रद्धेतून श्रद्धेकडे… ५५० वर्षांनंतर पुन्हा घरी गणरायाचे आगमन! 🙏

माझे नाव मल्लिनाथ जमादार. मी मूळचा सोलापूर जिल्ह्यातील अक्कलकोट तालुक्यातील बासलेगाव येथील रहिवासी आहे. आमच्या कुटुंबात पूर्वी गणपतीची स्थापना केली जात होती, अशी पूर्वजांकडून माहिती होती. मात्र गणपती आगमनाच्या दिवशी काही अनर्थ घडल्यामुळे आणि आमच्या पूर्वजांकडे असलेल्या जोकमारा राजा यांच्या मूर्तीची परंपरा असल्याने, गणपती व जोकमारा राजा यांचे तोंड परस्परांकडे पाहू नये, अशी रूढी निर्माण झाली. त्यामुळे आमच्या घरातील गणपतीची परंपरा जवळपास ५५० वर्षांपासून खंडित होती. यावर्षी माझा अवघा तीन वर्षांचा मुलगा शिवांश याने, “पप्पा, आपण यावर्षी गणपती आणूया,” असा आग्रह धरला. त्याने “आपल्या घरी गणपती का बसवत नाही?” असा निरागस प्रश्न विचारला आणि आम्हालाही या परंपरेचा नव्याने विचार करण्यास प्रवृत्त केले. आम्ही सर्वांनी विचारपूर्वक निर्णय घेतला की श्री गणेश हे प्रथम पूज्य दैवत असून प्रत्येक शुभ कार्याची सुरुवात गणेशवंदनेने होते. त्यामुळे भीती आणि अनिष्ट रूढींपेक्षा श्रद्धा, सकारात्मक विचार आणि नव्या पिढीला चांगले संस्कार देणे महत्त्वाचे आहे, असा विचार करून यावर्षी ५५० वर्षांपूर्वी खंडित झालेली गणपती स्थापनेची परंपरा पुन्हा सुरू केली. आज आमच्या घरी मोठ्या भक्तिभावाने आणि उत्साहाने गणेशोत्सव साजरा होत आहे. या नव्या सुरुवातीचे श्रेय माझ्या छोट्या शिवांशला जाते. त्याच्या निरागस प्रश्नाने आमच्या कुटुंबाला भीतीतून श्रद्धेकडे आणि रूढीतून सकारात्मक विचारांकडे जाण्याची प्रेरणा दिली. गणपती बाप्पा मोरया! मंगलमूर्ती मोरया! 🙏🌺
- Kind
- Story
- Place
- Osmanabad
- Art
- Rules of Discipline (Vainayikī vidyā) · Kala 63
- Contributed by
- Recorded, name withheld by the contributor
- Submitted
- 19 September 2026
- Accepted
- 19 September 2026
Evidence
This entry is record #2086 in a hash chain of 2,087. Each record commits to the one before it, so a change to any earlier record breaks every hash after it.
Record hash5890b18441242c39524ad33aabe4bdf9f0fd08fdc38ade06e1fe905bc9fc7136
Chain head0e77958462a998c1b0415bba98bc454453e4f72b64c61791fb24d7733ed93afa
The chain verifies end to end as of this page load.


