bappa.org
Maharashtra Ganeshotsav Archive
2026-02073
घारे वरचा गणपती

घारेवरचा उजव्या सोंडेचा गणपती करमाळा नगरपालिकेच्या जुन्या इमारतीत धारेचा पावन गणपती आहे. मूर्ती स्वयंभू असून नगरपालिकेचे बांधकाम करीत असताना ही मूर्ती पायाचे बांधकाम करताना मिळाली. मूर्ती १८६७ पूर्वीची आहे. स्थापना राजे रावरंभा यांच्या कालखंडात झालेली आहे. गेल्या कित्येक वर्षांपासून करमाळा नगरपालिकेचे कर्मचारी गणेशोत्सव साजरा करतात. श्रीगणेशाची अथर्व सूक्त येथे पाठ पठण केले जाते. करमाळ्यातील श्री कमलाभवानी देवीच्या पाठोपाठ या घरोचा पावन गणपतीचे फार मोठे अधिष्ठान आहे. संकष्ट चतुर्थी, गणेश चतुर्थी या दिवशी भाविक भक्त दर्शनाचा लाभ घेतात व आपल्या मनोकामना पूर्ण करून घेतात. गणेशोत्सवाच्या काळात सकाळ-संध्याकाळ गणेशाची आरती पाठ नियमित होते. तसेच अनंत चतुर्थी दिवशी श्रीदेवीचा माळावरील राजेराव रंभा तरुण मंडळाच्या जगदंबा देवस्थानच्या वतीने हत्तीवरून मिरवणूक काढून श्री गणेशाचे विसर्जन होते. सदर गणपती नवसास पावन आहे असे बोलले जाते. त्यामुळे या घरोच्या गणपती शेजारी विसर्जनासाठी दुसऱ्या एका गणपतीची प्रतिष्ठापना केली जाते व दोन्ही गणपतींची पूजाविधी गणेशोत्सव काळात केली जाते. या मंदिराचे पुजारी म्हणून नाना रामनवमीवाले परंपरागत करीत आहेत.
- Kind
- Story
- Place
- Solapur
- Art
- Choral Recitation (Sampāṭhya) · Kala 5
- Contributed by
- Recorded, name withheld by the contributor
- Submitted
- 19 September 2026
- Accepted
- 19 September 2026
Evidence
This entry is record #2083 in a hash chain of 2,108. Each record commits to the one before it, so a change to any earlier record breaks every hash after it.
Record hash9b145c8bcf17880f5efc22e892b373e3b502cbb4f447eb84e7790049464ef2e5
Chain head19b34ae55d58c3231924c0b0c52eea815811382636f6bc994dfd3539a92a556c
The chain verifies end to end as of this page load.


