bappa.org
Maharashtra Ganeshotsav Archive
2026-02071
२०० वर्ष जुनी गणपती उत्सवाची परंपरा

🙏 गणपती बाप्पा मोरया! 🙏 गुहागर तालुक्यातील पवारसाखरी गावातील निमायकर वाडा… गेल्या २०० वर्षांपासून गणपती बाप्पाच्या भक्तीने आणि परंपरेने उजळून निघणारा हा वाडा! दोन शतकांपासून चालत आलेली ही गणेशोत्सवाची परंपरा म्हणजे केवळ उत्सव नाही, तर आपल्या पूर्वजांनी जपलेली श्रद्धा, संस्कृती आणि कुटुंबाच्या एकतेचा अनमोल वारसा आहे. निमायकर वाड्यातील गणपती बाप्पाचे दर्शन घेताना अनुभवायला मिळतो तो भक्तीचा भाव, घराघरांतून दरवळणारा आनंद आणि आपल्या कोकणच्या समृद्ध संस्कृतीचा सुंदर ठेवा. या २०० वर्षांच्या परंपरेला मनापासून नमन! ❤️ 📍 ठिकाण: निमायकर वाडा, पवारसाखरी, ता. गुहागर, जि. रत्नागिरी चला, आपल्या गुहागरच्या गणपतींचा हा समृद्ध वारसा जाणून घेऊया! 🙏 गणपती बाप्पा मोरया! 🙏 #चला_गुहागरचे_गणपती_बघूया #निमायकरवाडा #पवारसाखरी #गुहागर #गणेशोत्सव #२००वर्षांचीपरंपरा #कोकण #Guhagarofficial
- Kind
- Story
- Place
- Ratnagiri
- Art
- The Art of Memory (Dhāraṇā-mātṛkā) · Kala 62
- Contributed by
- Recorded, name withheld by the contributor
- Submitted
- 19 September 2026
- Accepted
- 19 September 2026
Evidence
This entry is record #2081 in a hash chain of 2,083. Each record commits to the one before it, so a change to any earlier record breaks every hash after it.
Record hash9380bdf40bcbba6ee5543f725be36a4acec9d011b86a95b9b948225b8099b233
Chain head9b145c8bcf17880f5efc22e892b373e3b502cbb4f447eb84e7790049464ef2e5
The chain verifies end to end as of this page load.


