bappa.org
Maharashtra Ganeshotsav Archive
2026-02066
पाककृती

पंचखाद्य मोदक पाककृती :- १. खोबरं किसून मंद आचेवर भाजून घ्या. २. खारीक बी काढून तुकडे करून भाजून घ्या. खसखस भाजून घ्या. ३. खारीक, खसखस आणि खडीसाखर मिक्सरमध्ये बारीक करून घ्या. ४. त्यात भाजलेले खोबरे, किसमिस आणि वेलची पूड टाकून मिक्स करा. ५. मैदा घेऊन त्यात तुपाचे मोहन घाला. हाताने चांगले मिक्स करून दुधात किंवा पाण्यात घट्ट गोळा भिजवून घ्या. थोडा वेळ झाकून ठेवा. ६. नंतर छोट्या छोट्या पुऱ्या लाटून त्यात सारण भरून मोदक तयार करा. ७. तयार झालेले मोदक तेलात किंवा तुपात तळून घ्या. झाला आपला पंचखाद्य मोदकाचा प्रसाद तयार. अशाप्रकारे आपली कृती पूर्ण झाली.
- Kind
- Recipe
- Place
- Jalgaon
- Art
- Cooking (Citra-śāka-pūpa-bhakṣya-vikāra-kriyā) · Kala 42
- Contributed by
- Recorded, name withheld by the contributor
- Submitted
- 19 September 2026
- Accepted
- 19 September 2026
Evidence
This entry is record #2076 in a hash chain of 2,089. Each record commits to the one before it, so a change to any earlier record breaks every hash after it.
Record hash086e078531eb5354d118ae430d31c3658c468890bcba850ec4e339c57c5c22d5
Chain headb5793e8342bdc2af0e81c21099f8e79d68e1ca112d28911e2f56ff8d1a48daa0
The chain verifies end to end as of this page load.


