bappa.org
Maharashtra Ganeshotsav Archive
2026-02064
पिढीजात ज्येष्ठागौरी परंपरा

आमच्या घरी परंपरेनुसार गणेशोत्सव गणेश चतुर्थी ते अनंत चतुर्दशी या दरम्यान होतो. पहिल्या आणि शेवटच्या दिवशी बाप्पाला मोदकांचा नैवेद्य दाखवला जातो. सर्वात वैशिष्ट्यपूर्ण म्हणजे ज्येष्ठागौरी. घराण्यातील पूर्वापार प्रचलित परंपरेनुसार एकच गौरी स्थापन केली जाते व तिची ३ दिवस विधीवत पूजा केली जाते. पहिल्या दिवशी शेपूची भाजी, बाजरीची भाकरी व फोडणीचा भात, दुसऱ्या दिवशी पुरणपोळी व इतर पदार्थ आणि तिस-या दिवशी साळीडाळीच्या भाताचा नैवेद्य अर्पण केला जातो. गौरी विसर्जनादिवशी घरातील स्त्रीने दोरे घ्यायची परंपरा आहे. दरवर्षी गौरीची वेगवेगळ्या रूपात आम्ही स्थापना करतो.
- Kind
- Tradition
- Place
- सांगवी, ता. बारामती, जि.पुणे
- Art
- Cooking (Citra-śāka-pūpa-bhakṣya-vikāra-kriyā) · Kala 42
- Contributed by
- Recorded, name withheld by the contributor
- Submitted
- 19 September 2026
- Accepted
- 19 September 2026
Evidence
This entry is record #2074 in a hash chain of 2,089. Each record commits to the one before it, so a change to any earlier record breaks every hash after it.
Record hash37fc8b7c7cfd9de524e1db5d4b0e559111c1d087359987d80bfb05601eed7d67
Chain headb5793e8342bdc2af0e81c21099f8e79d68e1ca112d28911e2f56ff8d1a48daa0
The chain verifies end to end as of this page load.


