bappa.org
Maharashtra Ganeshotsav Archive
2026-02036
१)शेतकरी २) बैलगाडी

शेतकरी आणि बैलगाडी या देखाव्यात आमच्या घरी गणपती बाप्पा लाकडी गाडीवर विराजमान झाले आहेत. पुढे दोन सजवलेले पांढरे बैल जोडलेले असून बाप्पाच्या चरणांशी ताजी फळे, नारळ आणि पितळी समया मांडल्या आहेत. बाप्पाच्या मूर्तीने हातात बासरी धरली असून डोक्यावर मोरपीस आणि अंगावर गुलाबी वस्त्रे शोभून दिसत आहेत. संपूर्ण आरास खाली हिरवेगार गवत आणि छोट्या दिव्यांच्या रोषणाईने सजवली आहे. अशा उत्साहात आम्ही यंदा आमच्या बाप्पाचे स्वागत केले.
- Kind
- Story
- Place
- Palghar
- Art
- Arranging a Chamber (Śayana-racanā) · Kala 41
- Contributed by
- Recorded, name withheld by the contributor
- Submitted
- 19 September 2026
- Accepted
- 19 September 2026
Evidence
This entry is record #2046 in a hash chain of 2,050. Each record commits to the one before it, so a change to any earlier record breaks every hash after it.
Record hash1f03a4c07d7f01128e59e8a445777c576094ba0bc3ff82bc195d5576d3236259
Chain headc17111c7cb3f31344e72c07df97f5592ff6faf687d8bb02aca292e2af4cbfd7f
The chain verifies end to end as of this page load.


