bappa.org
Maharashtra Ganeshotsav Archive
2026-02029
कोकण वाचावा (Save Kokan)
कोकण वाचवा – समृद्ध आणि स्वावलंबी कोकणाकडे कोकण हे केवळ निसर्गाचे अप्रतिम लेणे नसून आपली समृद्ध संस्कृती आणि परंपरेचा मूळ पाया आहे. परंतु, आज रोजगाराच्या व व्यवसायाच्या शोधात आपली तरुण पिढी मोठ्या प्रमाणावर शहरांकडे स्थलांतरित होत आहे. यामुळे कोकणातील मूळ गावे ओस पडू लागली आहेत आणि आपल्या समृद्ध निसर्गाचे तसेच संस्कृतीचे संवर्धन होण्याऐवजी त्याला उतरती कळा लागत आहे. 'कोकण वाचवा' या देखाव्याच्या माध्यमातून आम्हाला हाच विचार मांडायचा आहे की, आपण शहरांवर अवलंबून न राहता कोकणातच स्थानिकांच्या मदतीने छोटे-मोठे उद्योग आणि व्यवसाय उभारले पाहिजेत. पर्यटन, प्रक्रिया उद्योग, स्थानिक कला आणि शेती यांसारख्या क्षेत्रांमध्ये स्वावलंबन निर्माण केले, तर येथेच रोजगाराच्या नवीन संधी निर्माण होतील. जेव्हा कोकणातील भूमिपुत्र स्वतःच्या मातीतच व्यावसायिक प्रगती साधतील, तेव्हाच कोकणाचा खरा आर्थिक विकास होईल. आपल्या संस्कृतीचे रक्षण करत, निसर्गाचा समतोल राखत, कोकणाला पुन्हा एकदा आर्थिक आणि सामाजिकदृष्ट्या वैभवशाली बनवणे हीच आपल्या सर्वांची खरी जबाबदारी आहे. Save Konkan – Towards a Prosperous and Self-Reliant Region Konkan is not just a land of breathtaking natural beauty, but the very foundation of our rich culture and heritage. However, due to the lack of local employment opportunities, a large portion of our youth is continuously migrating toward major cities. This growing shift is leading to the abandonment of our traditional villages and putting our unique environment and cultural roots at risk. Through our Ganpati Dekhava - 'Save Konkan', we aim to spread the message that true growth lies in self-development and local entrepreneurship. By starting small businesses, eco-tourism projects, and local enterprises right here in Konkan, we can generate substantial employment opportunities for our own people. Sustaining the local economy using the rich natural resources of Konkan will not only bring monetary prosperity to the region, but also ensure that our cultural identity and pristine nature remain vibrant and alive for generations to come.
- Kind
- Story
- Place
- Ratnagiri
- Art
- Costume and Stagecraft (Nepathya-yoga) · Kala 11
- Contributed by
- Recorded, name withheld by the contributor
- Submitted
- 18 September 2026
- Accepted
- 18 September 2026
Evidence
This entry is record #2039 in a hash chain of 2,050. Each record commits to the one before it, so a change to any earlier record breaks every hash after it.
Record hash60fc07a00bb9c5a64cedf8b0625066f5d43610ebc5e3169eb7d1a28b920aba28
Chain headc17111c7cb3f31344e72c07df97f5592ff6faf687d8bb02aca292e2af4cbfd7f
The chain verifies end to end as of this page load.


