bappa.org
Maharashtra Ganeshotsav Archive
2026-02024
Rajuricha Navgan Ganesha

राजुरीचा नवगण गणेशा डॉ सुवर्णा हुबेकर गोंदिया: बीड जिल्ह्यात जागृत असे गनपतीचे स्थान आहे आणि ते म्हणजे राजुरी चा नवगण गणेशा 🌹🌹 आख्यायिकेनुसार, या ठिकाणी ब्रह्मदेवाने तपश्चर्या केली होती आणि आपल्या हाताने नऊ गणपतींची स्थापना केली. गावात नऊ गणेशांचे अधिष्ठान असल्यामुळे या गावाला 'नवगण राजुरी' म्हटले जाते.रामायण काळाशी संबंध: त्रेतायुगात रावण सीतेचे हरण करून घेऊन गेल्यानंतर प्रभू श्रीराम आणि लक्ष्मण सीतेचा शोध घेत असताना या क्षेत्रात आले होते. त्यांनी या नवगण गणपतीचे दर्शन घेऊन आपला शोध सुरू केला असे मानले जाते. या मंदिरात आजही प्रभू श्रीरामाच्या पादुका आहेत.बालाघाट नाव: या गावाच्या पश्चिमेला बाल्व ऋषींचा आश्रम होता, त्यामुळे या डोंगरी भागाला 'बालाघाट' असेही नाव पडले.नवगण राजुरीचे नऊ गणपती आणि स्वरूपया क्षेत्रात मुख्य मंदिरात पाच आणि गावाच्या चार वेशींवर चार, असे एकूण नऊ गणपती आहेत.चार मुखांची दुर्मिळ मूर्ती: येथील मुख्य मंदिरात गणेशाची चार तोंडे (चार मुखे) असलेली एक अत्यंत दुर्मिळ आणि भव्य मूर्ती आहे. या मूर्तीच्या चारही दिशांना गणपतीची मुखे एकमेकांना जोडलेली आहेत:समोर: महामंगलेश्वरमागच्या बाजूला: शेषाद्रीदिष्टीतउजव्या बाजूला: मयुरेश्वरडाव्या बाजूला: उत्तिष्ठ गणपतीगावाच्या वेशीवरील चार रक्षक गणपती:पूर्व भागात: तिप्पट वाडी येथे पहिला गणपतीउत्तर बाजूला: शिरापूर येथे दुसरा गणपतीपश्चिम बाजूला: राधाबाई येथे तिसरा गणपतीदक्षिण बाजूला: लिंबा येथे संगमेश्वर नावा चौथा गणपतीप्रमुख उत्सव व परंपरामाघी गणेशोत्सव: येथे माघी गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. शुद्ध प्रतिपदेपासून सुरू होणाऱ्या या उत्सवात पहिल्या काही दिवस द्वारपूजा (गावाच्या चारही दिशांच्या रक्षक गणपतींची पूजा) केली जाते.पंचमीच्या दिवशी गणपतीचा 'जन्मकाळ' व संध्याकाळी कीर्तन होते.अष्टमीच्या दिवशी संपूर्ण गावातून देवाची पालखी मिरवणूक काढली जाते.याशिवाय प्रत्येक महिन्याच्या चतुर्थीला मंदिरात विशेष अभिषेक आणि मोठी यात्रा भरते. दूरवरून भाविक नवस फेडण्यासाठी आणि दर्शनासाठी येथे येतात.बीडमध्ये चार मुखांचा दुर्मीळ गणपती | ब्रह्मदेवाने स्थापन केलेला, नवसाला पावणारा चार तोंडाचा .. त्यानंतर ही नव गणांची राजुरी स्थापन झाली. पूर्व भागामध्ये तिप्पट वाडी या ठिकाणी पहिला गणपती आहे. उत्तर बाजूला शिरापूर या गावांमध्ये दुसरा गणपती आहे. तिसरा गणपती. ब्रह्मदेवाने स्थापन केलेले नऊ गणपतींचे नवगण राजुरी .. ब्रह्मदेवाने स्थापन केलेले नऊ गणपतींचे नवगण राजुरी, रामायण काळाशी संबध ... महाराष्ट्रात श्रीगणेशाचे अष्टविनायक रूप प्रसिद्ध आहेत. कठड्या समोरील बाजूला चार देवकोष्ठके आहेत. त्यांत श्रीगणेश, महालक्ष्मी, सरस्वती व गौरीहर यांच्या मूर्ती आहेत. प्रत्येक देवकोष्ठकाच्या दोन्ही बाजूला लघुशिखरे आहेत देखणं मंदिर मनाला खूप शांती देऊन जाते!!! डॉ सुवर्णा हुबेकर गोंदिया
- Kind
- Story
- Place
- Gondia
- Art
- Architecture (Vāstu-vidyā) · Kala 29
- Contributed by
- Recorded, name withheld by the contributor
- Submitted
- 18 September 2026
- Accepted
- 18 September 2026
Evidence
This entry is record #2034 in a hash chain of 2,051. Each record commits to the one before it, so a change to any earlier record breaks every hash after it.
Record hashf048921c725151d2ab1b39ac2a39a3e13393799378b1e14635e13b05ad004e8f
Chain head5d4bccfe2524bc72c35fa2940e30eb3a6c2d65e9d5f493f1cad3dc0e6b3c3c1e
The chain verifies end to end as of this page load.


