bappa.org
Maharashtra Ganeshotsav Archive
2026-02022
मोदक (उकडीचे मोदक)

१. सारण तयार करणे 1. एका कढईत १–२ चमचे तूप गरम करा. 2. त्यात खसखस घालून ३० सेकंद परता. 3. आता ओला नारळ घालून १ मिनिट परता. 4. गूळ घाला आणि मध्यम-कमी आचेवर गूळ विरघळेल पर्यंत शिजवा (जास्त कोरडे होऊ देऊ नका). 5. गॅस बंद करून वेलची पूड आणि चिरलेला सुकामेवा घालून मिक्स करा. 6. हे सारण पूर्ण थंड होऊ द्या. २. उकड तयार करणे 1. एका भांड्यात पाणी आणि दूध (किंवा फक्त पाणी) घालून उकळी आणा. 2. उकळी आल्यावर त्यात तूप आणि मीठ घाला. 3. आच एकदम कमी करा आणि हळूहळू तांदळाचे पीठ घालत जा, सतत ढवळत राहा. 4. पीठ घातल्यावर मिश्रण एकजीव होईल आणि पाणी शोषले जाईल; गॅस बंद करा. 5. हे मिश्रण १५–२० मिनिटे झाकून ठेवा. 6. नंतर कोमट झाल्यावर स्वच्छ हाताने किंवा मॅशरने चांगले मऊसर कणकेसारखे मळून घ्या (कोरडे पडू देऊ नका; गरजेनुसार थोडे कोमट पाणी/तूप लावा). ३. मोदक वळणे 1. उकडीच्या पिठाचे लहान गोळे करून घ्या. 2. प्रत्येक गोळ्याला तेल/तूप लावलेल्या हाताने किंवा रोलिंग पिनने पातळ पुरीसारखे वाटवा. 3. मध्यभागी १ चमचा सारण ठेवा. 4. कडा एकत्र आणून घट्ट बंद करा आणि वरून कळ्या पाडा (कोरड्या न राहतील म्हणून हाताला थोडे तूप लावा). 5. असे सर्व मोदक तयार करून घ्या. ४. मोदक उकडणे 1. स्टीमर किंवा कुकरमध्ये पाणी उकळवा. 2. स्टीमर प्लेटवर केळीचे पान किंवा ओले कापड ठेवा. 3. मोदक त्यावर मांडा (एकमेकांना चिकटू नयेत). 4. १५–२० मिनिटे चांगल्या वाफेवर उकडा. 5. गॅस बंद करून २–३ मिनिटे तसेच ठेवा, नंतर बाहेर काढा. ५. सर्व्हिंग • गरम मोदकावर थोडे साजूक तूप घालून सर्व्ह करा.
- Kind
- Recipe
- Place
- Ratnagiri
- Art
- Cooking (Citra-śāka-pūpa-bhakṣya-vikāra-kriyā) · Kala 42
- Contributed by
- Recorded, name withheld by the contributor
- Submitted
- 18 September 2026
- Accepted
- 18 September 2026
Evidence
This entry is record #2032 in a hash chain of 2,051. Each record commits to the one before it, so a change to any earlier record breaks every hash after it.
Record hashdba969df3f50e2341fed924f220827b56ce073fe7ea3b8364fff0f6f3aa3a772
Chain head5d4bccfe2524bc72c35fa2940e30eb3a6c2d65e9d5f493f1cad3dc0e6b3c3c1e
The chain verifies end to end as of this page load.


