bappa.org
Maharashtra Ganeshotsav Archive
2026-02021
छत्रपती संभाजी नगर मधील असे एक गणपती मंदिर आहे की ज्याचा इतिहास पौराणिक आहे.

सिंदूरात्मक गणेशाचे शेंदुरवादा गाव १. मंदिराचे महत्त्व आणि ओळख मराठवाड्यासह पश्चिम महाराष्ट्राचे श्रद्धास्थान असलेले शेंदूरवादा (ता. गंगापूर, जि. छत्रपती संभाजीनगर) येथे खाम नदीच्या तीरावर (भागीरथी तीर्थ) द्वापर युगातील गणेश पुराणात उल्लेख असलेले स्वयंभू व जाग्रुत 'सिंदूरात्मक गणेशाचे' प्रसिद्ध मंदिर आहे. हे मंदिर पूर्णपणे दगडाने अष्टकमानी (हेमाडपंथी) बांधकामाचा उत्कृष्ट नमुना आहे. वास्तुविशारद आणि स्थापत्यकलेचा हा सुरेल संगम अभ्यासकांसाठी नेहमीच प्रेरणा देणारा ठरतो. अष्टविनायकांमध्ये पूर्णाकृती असलेली ही एकमेव गणेशमूर्ती असल्यामुळे या सिंदूरात्मक गणपतीला 'गणपतीचा राजा' असेही संबोधले जाते. २. ऐतिहासिक पार्श्वभूमी व शिलालेख * जीर्णोद्धार: या मंदिराचा जीर्णोद्धार १७६४ मध्ये राजा भोज यांनी केला असल्याचा उल्लेख मंदिराच्या दर्शनी भागावरील शिलालेखात पाहायला मिळतो. * स्थापत्य व वास्तुकला: पुरातन कलाकृतीचा उत्कृष्ट नमुना म्हणून इतिहासप्रेमी या वास्तुकडे पाहतात. मंदिराच्या गाभाऱ्यात दक्षिणमुखी भव्य वाळूची मूर्ती आहे. नदीत उतरण्यासाठी सुंदर घाट आणि भाविकांच्या मुक्कामासाठी वाडा या ठिकाणी उपलब्ध आहे. * परिसरातील इतर ऐतिहासिक वास्तू: याठिकाणी सिंदूरात्मक गणेश मंदिरासोबतच स्वयंभू विठ्ठल मंदिर आणि १६ व्या शतकातील मध्वमुनीश्वर मंदिर देखील आहे. जवळच वाहणारी खाम नदी आणि येथील विलोभनीय निसर्गसौंदर्य पर्यटकांचे मन वेधून घेते. ३. शेंदूरवाद्यातील गणेशाची पौराणिक कथा (सिंदुरासुराचा वध) शेंदूरवादा या गावाशी सिंधुरासुराचा वध आणि गणेशाचे स्वतःचे वाहन मूषक यास दिलेली मुक्ती या दोन प्रमुख पौराणिक घटनांचा संदर्भ जोडलेला आहे. * उत्पत्ती: गणेश पुराणाच्या उत्तरार्धातील क्रीडाखंडामध्ये अध्याय १२७ ते १३८ दरम्यान सिंधुरासुराच्या वधाची कथा आली आहे. एकदा ब्रह्मदेवाच्या रागाने दिलेल्या जांभईतून एका पुरुषाची निर्मिती झाली, ज्याचे संपूर्ण अंग शेंदरी रंगाचे होते. ब्रह्मदेवांनी त्याला ‘तू ज्याला रागाने मिठी मारशील तो तत्काळ मृत्यू पावेल’ असा वर दिला. पुढे गर्व चढल्यामुळे त्याने ब्रह्मदेव आणि विष्णूंनाही संकटात टाकले आणि कैलासात पार्वतीवर मोहित होऊन
- Kind
- Story
- Place
- Chhatrapati Sambhajinagar
- Art
- Architecture (Vāstu-vidyā) · Kala 29
- Contributed by
- पत्रकार शिवाजी तांबे
- Submitted
- 18 September 2026
- Accepted
- 18 September 2026
Evidence
This entry is record #2031 in a hash chain of 2,051. Each record commits to the one before it, so a change to any earlier record breaks every hash after it.
Record hash7c5c220ccf08a10eeb01eb46dae9a28a019e75ac62af3115d47ea366ca7eca1a
Chain head5d4bccfe2524bc72c35fa2940e30eb3a6c2d65e9d5f493f1cad3dc0e6b3c3c1e
The chain verifies end to end as of this page load.


