bappa.org
Maharashtra Ganeshotsav Archive
2026-02012
शिंदे परिवार

शिंदे घराण्याच्या गणपतीची शताब्दी शिंदे घराण्यातील श्री गणेशोत्सवाची परंपरा इ.स. १९२७ मध्ये सुरू झाली. या परंपरेची सुरुवात कै. रामचंद्र कृष्णाजी शिंदे यांच्या दृढ श्रद्धा आणि नवसातून झाली. कै. रामचंद्र कृष्णाजी शिंदे यांनी श्री गणरायाला नवस केला होता की, “मला पहिला मुलगा झाल्यास मी माझ्या घरात श्री गणेशाची प्रतिष्ठापना करून दरवर्षी गणेशोत्सव साजरा करीन.” श्री गणरायाच्या कृपेने इ.स. १९२६ मध्ये त्यांना प्रथम पुत्ररत्न प्राप्त झाले. त्यांचे नाव कै. गणपत रामचंद्र शिंदे असे ठेवण्यात आले. नवस पूर्ण करण्यासाठी इ.स. १९२७ मध्ये शिंदे घराण्यात प्रथमच श्री गणेशाची प्रतिष्ठापना करण्यात आली आणि तेव्हापासून ही अखंड परंपरा सुरू झाली. आज या पवित्र परंपरेची धुरा शिंदे घराण्याची चौथी पिढी समर्थपणे सांभाळत आहे. यावर्षी शिंदे घराण्याच्या गणपतीच्या शताब्दी वर्षाचा मंगल सोहळा साजरा होत आहे. हा शंभर वर्षांचा श्रद्धा, भक्ती आणि संस्कारांचा अमूल्य वारसा पुढील पिढ्यांपर्यंत असाच अखंड, परंपरेने आणि भक्तिभावाने चालू राहो, हीच श्री गणरायाच्या चरणी प्रार्थना. ॥ गणपती बाप्पा मोरया! मंगलमूर्ती मोरया! ॥
- Kind
- Story
- Place
- Thane
- Art
- The Art of Memory (Dhāraṇā-mātṛkā) · Kala 62
- Contributed by
- Recorded, name withheld by the contributor
- Submitted
- 18 September 2026
- Accepted
- 18 September 2026
Evidence
This entry is record #2022 in a hash chain of 2,051. Each record commits to the one before it, so a change to any earlier record breaks every hash after it.
Record hashe91b62f0b6659e3515036450b400191eb230df1dc11fda5dc0fdcce213c08728
Chain head5d4bccfe2524bc72c35fa2940e30eb3a6c2d65e9d5f493f1cad3dc0e6b3c3c1e
The chain verifies end to end as of this page load.


