bappa.org
Maharashtra Ganeshotsav Archive
2026-01979
गणेशोत्सव वर्षे ८ वे पटणे परिवार पालखी देखावा
*अविनाश पटणे* *ग्रीन काउंटी फेज २ , भेकराईनगर ,फुरसुंगी , हडपसर पुणे ४१२३०८* आम्ही प्रतिवर्षी अनेक देखावे सादर करत आलो आहोत. यंदाचे आमचे *आठवे* वर्ष आहे. मागील वर्षी *पटणे वाडा* हा देखावा सादर केला होता. यंदाच्या वर्षी *पंढरीची वारी* हा देखावा सादर करण्याचा प्रयत्न केला आहे. पंढरीची वारी हा महाराष्ट्राच्या सांस्कृतिक आणि आध्यात्मिक जीवनाचा एक अतिशय महत्त्वाचा आणि अथांग भक्तीचा उत्सव आहे. ही शतकानुशतके चालत आलेली एक वैष्णव परंपरा आहे, 'वारी' म्हणजे नियमितपणे ठरावीक वेळी केलेली तीर्थयात्रा. जे भाविक ही वारी दरवर्षी न चुकता करतात, त्यांना वारकरी म्हटले जाते. वारी हा एक आनंद सोहळाच असतो. समता,बंधुत्व,सद्भभावना,भक्ती,शक्ती, अध्यामिक वारसा हि महाराष्ट्राची देणगी आहे.याच वारसाने विविधतेत एकता आणि एकतेतुन विविधता याचा संगम म्हणजे *पालखी सोहळ्यातील विठ्ठलाच्या दर्शनासाठी निघालेली पायीवारी होय.* या वर्षी गणेशोत्सवाचे औचित्यपूर्ण संकल्पनेनुसार या वारीचे यथार्थ दर्शन घेण्यासाठी सजावट केलेली आहे. या भक्ती रसात समरस होण्याकरिता भेट देऊन आनंद द्विगुणीत करावा.
- Kind
- Story
- Place
- Pune
- Art
- Costume and Stagecraft (Nepathya-yoga) · Kala 11
- Contributed by
- Recorded, name withheld by the contributor
- Submitted
- 18 September 2026
- Accepted
- 18 September 2026
Evidence
This entry is record #1989 in a hash chain of 2,051. Each record commits to the one before it, so a change to any earlier record breaks every hash after it.
Record hash895a317d8ded16bbb702eea3c57eca657ad8785c8b4e47cee9b1c1114138cbda
Chain head5d4bccfe2524bc72c35fa2940e30eb3a6c2d65e9d5f493f1cad3dc0e6b3c3c1e
The chain verifies end to end as of this page load.


