bappa.org
Maharashtra Ganeshotsav Archive
2026-01926
छटा बालपण ते तरुणपण सहप्रवासातल्या
मी मंजिरी अमोल यादव मी लहान असल्यापासून गणपती बाप्पा पाहत आले आहे लहानपणी मुंबई मध्ये खूप गरिबीत होती गणपती बाप्पा येणार आहे असे कळल्यावर महिनाभर अगोदर आम्ही भाऊ बहीण चाळीतील सर्व ज्येष्ठ नागरिक तरुण लहान मुले गणपती बुक करण्यासाठी जायचो व गणपती बुक केल्यानंतर शाळेत जाताना येताना गुपचूप मूर्तिकार यांच्या घरी जाऊन बघून यायचो मला आठवते १९९४ साली शेषनाग आणि त्यावर स्वार गणेशमूर्ती त्या मूर्तीकार काकांनी बनवली होती आणि ती बनवताना बनवताना घडवताना मी स्वतः साक्षीदार होतो आणि आहे ते मूर्तिकार आज या जगात नाही ती मूर्ती जय महाराष्ट्र तरुण मित्र मंडळ शिवसेना मैदान संजय नगर कांदिवली पश्चिम या मंडळाची होती व सदर मूर्ती यंग स्टार क्रीडा क्लब धनुकरवाडी कांदिवली गावठाण मुंबई 67 या ठिकाणी विसर्जन करण्यात आली व सदर मूर्तीचा छायाचित्र पुरस्कार त्यावेळी चे दैनिक नवाकाळ या वर्तमानपत्रात छापून आले होते आज ती मूर्तिकार या जगात नाहीत आणि जय महाराष्ट्र तरुण मित्र मंडळ याचे सर्व जुने कार्यकर्ते या जगात नाहीत किंवा माझ्यासारखे परिस्थितीनुसार मुंबईबाहेर फेकले गेले आज गणपती बाप्पा आलेत पुण्यात आहे पण आज पण लहानपणीची ती आठवण आली जीव कासावीस होतो आज शिवसेना मैदान आहे कांदिवली पश्चिम येथे पण तो काळ सरकला पुढे आता त्या आठवणी फक्त शिवसेना मैदान संजय नगर ह्या नावात आहेत. सारांश कथेचा असाच आहे माननीय श्री हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांची भविष्यवाणी खरी ठरली मराठी माणूस मुंबई बाहेर फेकला गेला ही संस्कृती परंपरा कायम टिकून राहावी ही श्री सिद्धिविनायक गणपती चरणी प्रार्थना
- Kind
- Story
- Place
- Pune
- Art
- The Art of Memory (Dhāraṇā-mātṛkā) · Kala 62
- Contributed by
- Recorded, name withheld by the contributor
- Submitted
- 18 September 2026
- Accepted
- 18 September 2026
Evidence
This entry is record #1936 in a hash chain of 2,051. Each record commits to the one before it, so a change to any earlier record breaks every hash after it.
Record hashc77a7805fca52696d5125590cda8ef260f436008f94687b69065f061299d816d
Chain head5d4bccfe2524bc72c35fa2940e30eb3a6c2d65e9d5f493f1cad3dc0e6b3c3c1e
The chain verifies end to end as of this page load.


