bappa.org
Maharashtra Ganeshotsav Archive
2026-01887
जास्वंदीचा बाप्पा 🥰...

पार्वती मातेने अंगावरील चंदनापासून/हळदीपासून एक बालक तयार केले आणि त्याला दारात पहारेकरी ठेवले. स्नान करताना शंकरांनी प्रवेश केला असता बालकाने रोखले, संतापलेल्या शंकरांनी त्याचे शिरच्छेद केले. पार्वतीच्या दुःखापोटी शंकरांनी हत्तीचे मस्तक बसवून बालकाला जीवनदान दिले. पारंपरिक व्रताची कहाणी वाचताना , सुरवात : ऐका परमेश्वरा गणेशा, तुमची कहाणी, निर्मळ मळे, उदकाचे तळे , बेलाचे वृक्ष, सुवर्णाची कमळे, विनायकाची देवळे रावळे अशी करतात . वसा कधी घ्यावा : श्रावण चतुर्थीला घ्यावा , माघ चतुर्थीला पूर्ण करावा. संपूर्णाला काय करावे : पावशे - पावलीचे पीठ काढावे, १८ लाडू करावे. ६ देवाला, 6 ब्राम्हणाला द्यावे, 6 कुटुंबियांसोबत फराळ/भोजन करावे(अल्प दान, महापुण्य).
- Kind
- Story
- Place
- Ratnagiri
- Art
- Reading Aloud (Pustaka-vācana) · Kala 13
- Contributed by
- Recorded, name withheld by the contributor
- Submitted
- 18 September 2026
- Accepted
- 18 September 2026
Evidence
This entry is record #1897 in a hash chain of 2,051. Each record commits to the one before it, so a change to any earlier record breaks every hash after it.
Record hashf465def246c051bf5a796c1b9625dbb16b11bf5a26178c6a84923209bb26e512
Chain head5d4bccfe2524bc72c35fa2940e30eb3a6c2d65e9d5f493f1cad3dc0e6b3c3c1e
The chain verifies end to end as of this page load.


