bappa.org
Maharashtra Ganeshotsav Archive
2026-01871
Bappa favourite person
देवी पार्वतीला सर्व देवांनी अमृतापासून तयार केलेले एक दिव्य मोदक दिले. मोदक बघून दोन्ही मुले(कार्तिकेय आणि गणेश)आई कडून मागू लागले तेव्हा आईने मोदकाच्या महत्त्वाचे वर्णन करून म्हटले की आपल्या दोघांमधून धर्माच्या दृष्टीने श्रेष्ठ होऊन सर्व तीर्थ क्षेत्रांना प्रथम भेट देईल, त्यालाच हे मोदक मिळेल. आईची गोष्ट ऐकून कार्तिकेय तर आपल्या मोरावर बसून एक चांगले मुहूर्त बघून सर्व तीर्थक्षेत्रांना भेट देऊन आले. इथे गणेशाचं वाहन उंदीर असल्यामुळे ते असं करण्यास असमर्थ होते. तेव्हा गणेशाने अत्यंत आदराने आपल्या आई वडिलांच्या भोवती प्रदक्षिणा घालून त्यांच्यासमोर जाऊन उभे राहिले. हे बघून आई पार्वती म्हणाल्या की सर्व तीर्थक्षेत्रात केलेले स्नान, सर्व देवांना केलेला नमस्कार, सर्व यज्ञाची फलप्राप्ती, सर्वप्रकारचे उपास, मंत्र, योग आणि संयमाचे पालन हे सर्व आई वडिलांच्या पूजेच्या सोळाव्या भागाच्या बरोबर देखील असू शकत नाही. म्हणून हे गणेश शेकडो पुत्र आणि शेकडो गणांच्यापेक्षा वर आहे. म्हणून हे मोदक मी गणेशाला देत आहे. आई-वडिलांच्या भक्तीमुळे प्रत्येक यज्ञात सर्वात आधी गणेशाची पूजा होईल.-पद्मपुराण.
- Kind
- Story
- Place
- Katroli
- Art
- The Art of Memory (Dhāraṇā-mātṛkā) · Kala 62
- Contributed by
- Recorded, name withheld by the contributor
- Submitted
- 17 September 2026
- Accepted
- 18 September 2026
Evidence
This entry is record #1881 in a hash chain of 2,051. Each record commits to the one before it, so a change to any earlier record breaks every hash after it.
Record hash66d498e789c1ecd497ddbb393138a014b0a6dae9d32399194a831384c35548e3
Chain head5d4bccfe2524bc72c35fa2940e30eb3a6c2d65e9d5f493f1cad3dc0e6b3c3c1e
The chain verifies end to end as of this page load.


