bappa.org
Maharashtra Ganeshotsav Archive
2026-01748
Jejuri gad temple dekhava

नमस्कार 🙏 यावर्षी आमच्या गणपती सजावटीसाठी आम्ही महाराष्ट्राचं कुलदैवत असलेल्या श्री खंडोबा देवाच्या जेजुरी नगरीची थीम निवडली आहे. जेजुरी म्हटलं की डोळ्यासमोर येतो तो भंडाऱ्याने न्हाऊन निघालेला गड, “येळकोट येळकोट जय मल्हार”चा जयघोष आणि भक्तीने भरलेलं वातावरण. या सजावटीतून आम्ही जेजुरीची परंपरा, संस्कृती आणि भक्तीचा अनुभव गणरायाच्या चरणी साकारण्याचा छोटासा प्रयत्न केला आहे. एकीकडे गणरायाचा आशीर्वाद आणि दुसरीकडे मल्हारी मार्तंडाची कृपा — या दोन श्रद्धास्थानांचा सुंदर संगम म्हणजे आमची ही जेजुरी थीम. आमच्या या सजावटीतून महाराष्ट्राच्या संस्कृतीची आणि परंपरेची ओळख सर्वांपर्यंत पोहोचावी, हाच आमचा उद्देश आहे. गणपती बाप्पा मोरया! येळकोट येळकोट जय मल्हार! 🙏💛
- Kind
- Tradition
- Place
- Pune
- Art
- Costume and Stagecraft (Nepathya-yoga) · Kala 11
- Contributed by
- Recorded, name withheld by the contributor
- Submitted
- 18 September 2026
- Accepted
- 18 September 2026
Evidence
This entry is record #1758 in a hash chain of 2,051. Each record commits to the one before it, so a change to any earlier record breaks every hash after it.
Record hash5b4386e3a33481055aac717858bcf6196fda2aead487826879d3b3e42bbac733
Chain head5d4bccfe2524bc72c35fa2940e30eb3a6c2d65e9d5f493f1cad3dc0e6b3c3c1e
The chain verifies end to end as of this page load.


