bappa.org
Maharashtra Ganeshotsav Archive
2026-01740
मिरा - भाईंदर चा महागणपती साईदया मित्र मंडळ नवघर रोड, भाईंदर (पूर्व)

31 वर्षांपूर्वी भाईंदर पूर्वेच्या नवघर रोड वर स्थापन झालेले साई दया मित्र मंडळ टिटवाळा येथील मूर्तिकार आर. बी. गोडांबे यांची सुबक मूर्ती आणि चलचित्राच्या माध्यमातून थोड्याच वर्षात भाईंदर च्या घराघरात पोहचले. गणेशोत्सवा सोबत नवरात्र सुद्धा आयोजित करणाऱ्या मोजक्याच मंडळाच्या यादीत यायला आम्हाला सुरुवातीची फक्त 5 वर्षें लागली. बाकीची सार्वजनिक मंडळे जेव्हा आपल्या मुर्त्यांना भाईंदर चा राजा,...... यासारखी tagline लावत होते तेव्हा आम्ही उभे राहण्यासाठी धडपडत होतो. पण आज शेकडो कार्यकर्त्यांच्या विस्वासावर आणि देणगीदारांच्या सहयोगावर हे मंडळ भक्कम पणे या शर्यतीच्या जगात उभे आहे. 31 व्या वर्षी सभासदांच्या इच्छेखातर आणि मिरा भाईंदर मध्ये एक नवीन ओळख मिळावी म्हणून या वर्षी आपण आपल्या बाप्पाला "मिरा भाईंदर चा महागणपती" अशी tagline दिली. ती tagline सर्व भाविकांच्या मनात कोरण्याचे काम आता चालू आहे, आणि त्यासाठी आपल्या सर्वांचा सहयोग हवाच. उत्सवा सोबतच खालील प्रमाणे समाजसेवी उपक्रम मंडळ राबवत असते: -गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदत आणि वह्या वाटप. -नवघर रोड वरील गरजू नागरिकांना वैद्यकीय मदत -टेम्बा हॉस्पिटल मध्ये व्हिलचेअर देणे -वर्षातून एकदा अनाथश्रमात अन्न सामग्री पुरवणे. -नवरात्रौस्तावा निमित्त हजार लोकांचा भंडारा. -नवरात्रौ दरम्यान भवानी ला आलेल्या साड्या, सौभाग्य अलंकार आणि इतर वस्तूंचे "गुज फौंडेशन" या NGO ला दान करणे. पुढे ते गावखेड्यात या वस्तूंचे गरजेनुसार वाटप करतात. -रस्ता दुरुस्ती साठी आंदोलन -इंडस्ट्रियल एरिया मध्ये साफसफाई अभियान. -प्लास्टिक / पोलिथीन बॅग च्या निषेधार्थ मोर्चा -पूरग्रसतांना घरगुती सामानाचे वाटप आजवर मंडळाला मिळालेले मोठे सन्मान : 1) लोकसत्ता माणिकचंद गणेशदर्शन स्पर्धा 2001 मध्ये मिरा रोड ते विरार विभागात सर्वोत्कृष्ठ चालचित्राचे "प्रथम पारितोषिक. 2) मिरा भाईंदर महानगरपालिका आयोजित सार्वजनिक गणेश सजावट स्पर्धेमध्ये 1998 साठी सर्वोत्कृष्ठ मूर्तिचे चे "प्रथम पारितोषिक". 3) मिरा भाईंदर शहर पत्रकार संघटना श्री. गणेश दर्शन स्पर्धेमध्ये 2013 साठी सर्वोत्कृष्ठ गणेश मंडळ - प्रथम पारितोषिक. 4) मिरा भाईंदर शहर पत्रकार संघटना श्री. गणेश दर्शन स्पर्धेमध्ये 2016 साठी सर्वोत्कृष्ठ मंडळ - प्रथम पारितोषिक.
- Kind
- Story
- Place
- Palghar
- Art
- Rules of Discipline (Vainayikī vidyā) · Kala 63
- Contributed by
- Recorded, name withheld by the contributor
- Submitted
- 18 September 2026
- Accepted
- 18 September 2026
Evidence
This entry is record #1750 in a hash chain of 2,051. Each record commits to the one before it, so a change to any earlier record breaks every hash after it.
Record hashdc398dbdda0c31f56ab7d17a6b65d3d91078b967732993ff3a6c734bfab9aeb4
Chain head5d4bccfe2524bc72c35fa2940e30eb3a6c2d65e9d5f493f1cad3dc0e6b3c3c1e
The chain verifies end to end as of this page load.


