bappa.org
Maharashtra Ganeshotsav Archive
2026-01736
आमच्या घरचा पन्नास हून अधिक वर्षाची परंपरा असणारा घरगुती गणेशोत्सव.

आमचे आजोबा श्री सदाशिव हरी बाचल हे आमच्या शिंपी समाजातील, मसूर (ता. कराड) पंचक्रोशीतील एक नामांकित नाव होते. ते केवळ माणसाची शरीरयष्टी पाहून, कोणतेही मोजमाप न घेता शर्ट व विजार शिवायचे असे जुन्या जाणत्या लोकांकडून ऐकून आहे. ते सायकलवरून गावोगावी फिरून लोकांच्या कपडे शिवण्याच्या ऑर्डर्स घ्यायचे व घरी येऊन ऑर्डर प्रमाणे शर्ट विजार, लहान मुलांची कपडे, टोपडी वगैरे शिवून विकायचे. आमची आजी सौ काशीबाई सदाशिव बाचल ही मूळची जेजुरीची होती. जेजुरी सारख्या धार्मिक क्षेत्रात त्यांचे बालपण वावरल्याने ती धार्मिक व आध्यात्मिक स्वभावाच्या होती. गणपती बाप्पा वर त्यांची श्रद्धा होती आणि त्यासाठी ती गणेशोत्सव त्या काळात सुद्धा उपलब्ध साधनसामग्री वरती देखील चांगल्या पद्धतीने आणि आनंदाने करायची. पुढे हाच वारसा आमचे वडील श्री संजय सदाशिव बाचल व त्यांच्यासोबत आजमितीस मी सौरभ संजय बाचल व माझा भाऊ चि. ऋतुराज संजय बाचल हे जोपासत आहोत. गणेशोत्सव म्हणजे आनंदोत्सव या उक्तिस अनुसरून आम्ही यथाशक्ती मनोभावे गणेशोत्सव साजरा करतो. सर्व मित्रपरिवार आणि नातेवाईक यांना गणेशोत्सवाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा.
- Kind
- Story
- Place
- Satara
- Art
- Needlework and Tailoring (Sūci-vāna-karma) · Kala 35
- Contributed by
- Recorded, name withheld by the contributor
- Submitted
- 18 September 2026
- Accepted
- 18 September 2026
Evidence
This entry is record #1746 in a hash chain of 2,051. Each record commits to the one before it, so a change to any earlier record breaks every hash after it.
Record hasha4328fbb875be128a66eda5ef9e01f11e1d65856003ba963495a67568c5f8fdd
Chain head5d4bccfe2524bc72c35fa2940e30eb3a6c2d65e9d5f493f1cad3dc0e6b3c3c1e
The chain verifies end to end as of this page load.


