bappa.org
Maharashtra Ganeshotsav Archive
2026-01723
आठवण गणपती बाप्पांची
खरं म्हणजे आम्ही राहायला पेण रायगड येथे आहोत,पण मांझ गाव हे निसर्गरम्य कोकणातील चिपळूण हे असल्यामुळे गणपती बाप्पांच कधी एकदा आगमन होत आणि त्यांना डोळे भरून पाहतो असं वाटतं त्यामुळे गेले 3५ ते ४० वर्षांपासून आम्ही आमचा गणपती बाप्पा अगदी आगमनाच्या अर्धा महिना अगोदर पेण वरुन रेल्वेने अगदी सुखरूपपणे चिपळूणला आमच्या गावी घेऊन येतो आणि आम्ही कामाला असल्यामुळे फार सूट्टया मिळत नाहीत पण कोकणातील गणेशोत्सव म्हटला कि आमच्या जिव्हाळ्याचा विषय त्यामुळे काहीही झालं तरी पाच दिवस सुट्टी हि घेणारच म्हणून जशी सुट्टी मिळेल तशी सुट्टी घेऊन गणपतीला आम्ही कौकणात येतो आणि आदल्या दिवशी गणपतीचा मखर वैगरे बसवून छान सजावट करून गणपतीच्या दिवशी बाप्पां विराजमान होतात , सकाळ, सायंकाळी आरती आणि रात्री भजन वैगरे करून तसेच वेगवेगळ्ने नृत्य करून मन अगदी प्रसन्न होत ,३६५ दिवसातले हेच ते ५ दिवस सुखाचे असतात...आणि पाचव्या दिवशी बाप्पाला निरोप देताना अक्षू अनावर होतात आणि आमचे बाप्पा पुढच्या वर्षी लवकर येण्यासाठी आम्हाला सोडून जातात....अजुन लिहिणयासारखे खुप आहे पण आता इथेच थांबतो नाही तर तुम्ही म्हणाल याला गोष्ट लिहायला सांगितली पण ह्याने निबंधच लिहिला...असा हा आमचा कोकणातील कधीही न विसरणारा गणेशोत्सव... तुम्हा सर्वांना गणेशोत्सवाच्या शिवमय शुभेच्छा 🙏🏻🚩जय शिवराय जय गणराय 🚩🙏🏻
- Kind
- Story
- Place
- Raigad
- Art
- Choral Recitation (Sampāṭhya) · Kala 5
- Contributed by
- Recorded, name withheld by the contributor
- Submitted
- 18 September 2026
- Accepted
- 18 September 2026
Evidence
This entry is record #1733 in a hash chain of 2,051. Each record commits to the one before it, so a change to any earlier record breaks every hash after it.
Record hashf4bf269b6b194ed05771ca928493e947cf2bcfd53c6de16f10301a7e1486eeed
Chain head5d4bccfe2524bc72c35fa2940e30eb3a6c2d65e9d5f493f1cad3dc0e6b3c3c1e
The chain verifies end to end as of this page load.


