bappa.org
Maharashtra Ganeshotsav Archive
2026-01655
आजीची आठवण आणि महागणपती

माझ्या अगदी लहानपणीची गोष्ट आहे, मी चार ते पाच वर्षाचे असणार माझ्या आजीबरोबर राहायची. आजी म्हणजे, माझ्या बाबांची आई. रोज सकाळी मला उठवताना ती एक गाणं गायची आणि ते माझ्या एवढ्या जवळच आहे, अगदी माझ्या मनाला भिडलेलं की सर्वात पहिले दर्शन मी त्याच गणपतीचे केले ते म्हणजे "रांजणगाव चे महागणपती" . आणि ते गाणे म्हणजे "रांजणगावाला गावाला महागणपती नांदला चला पहाटे पहाटे देव केव्हाचा जागला". आज आजी आमच्यात नाही आहे. आजी नसली तरीही ते गाणं आणि तिची ती आठवण मला आयुष्यभर माझी सोबतीन बनून राहिलेली आहे आणि आमच्या घरी गणपतीची 85 वर्षांची परंपरा आम्ही ती अजूनही जागी ठेवलेली आहे. त्यामुळेच यावर्षीचा हा देखावा - अगदीच गुहेतून महादेवांच्या आशीर्वादाने गणपती प्रकट व्हावे असा हा देखावा
- Kind
- Story
- Place
- Amravati
- Art
- Dawn Minstrelsy (Vaitālikī vidyā) · Kala 6
- Contributed by
- Recorded, name withheld by the contributor
- Submitted
- 18 September 2026
- Accepted
- 18 September 2026
Evidence
This entry is record #1665 in a hash chain of 2,051. Each record commits to the one before it, so a change to any earlier record breaks every hash after it.
Record hashbfed562492b5f91198257c8402ede143db1dbccaf2be2c8e53c4fb8f11ebd986
Chain head5d4bccfe2524bc72c35fa2940e30eb3a6c2d65e9d5f493f1cad3dc0e6b3c3c1e
The chain verifies end to end as of this page load.


