bappa.org
Maharashtra Ganeshotsav Archive
2026-01596
सार्वजनिक मंडळाचा गणपती ते “पुजाऱ्यांचा राजा बाप्पा माझा”

३५ वर्षांची अखंड परंपरा, श्रद्धा आणि कुटुंबाच्या एकोप्याची प्रेरणादायी कहाणी. गणेशोत्सव हा महाराष्ट्राच्या संस्कृतीचा आणि सामाजिक एकोप्याचा उत्सव आहे. उल्हासनगर-४, संतोषनगर परिसरातील सार्वजनिक गणेशोत्सवाची सुरुवात १९८१ ते १९८९ या काळात नागरिकांच्या सहभागातून झाली. आकर्षक देखावे, भजन-कीर्तन, सांस्कृतिक कार्यक्रम, चित्रपट आणि सत्यनारायण महापूजा यामुळे हा उत्सव परिसराच्या आनंदाचा केंद्रबिंदू बनला होता. काळाच्या ओघात अनेक कार्यकर्ते स्थलांतरित झाले आणि सार्वजनिक गणेशोत्सव बंद होण्याची वेळ आली. मात्र परंपरा खंडित होऊ नये या श्रद्धेतून १९९० पासून पुजारी परिवाराने सार्वजनिक मंडळाच्या गणपतीची स्थापना आपल्या घरी करण्याचा संकल्प केला. तेव्हापासून आजपर्यंत ही परंपरा अखंड सुरू आहे. गेल्या ३५ वर्षांत सजावट, प्रकाशयोजना, सामाजिक संदेश देणाऱ्या चारोळ्या, विशेष टी-शर्ट, गांधी टोपी, पताका, बिल्ले, लॉकेट, विशेष गीते आणि “पुजाऱ्यांचा राजा मोरया” आरती अशा विविध उपक्रमांतून या गणेशोत्सवाला आगळी ओळख मिळाली आहे. स्थानिक वृत्तपत्रांनीही या वैशिष्ट्यपूर्ण गणेशोत्सवाची अनेकदा दखल घेतली आहे. गौरी आगमन, हळदी-कुंकू, गौरी जागर, सत्यनारायण महापूजा आणि डबल आरती यामुळे उत्सवात भक्तीबरोबरच कौटुंबिक स्नेहाचे वातावरण निर्माण होते. विसर्जनाच्या दिवशी ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाची मिरवणूक काढून भावपूर्ण वातावरणात गणरायाला निरोप दिला जातो. आज “पुजाऱ्यांचा राजा बाप्पा माझा” हा केवळ एका घरातील गणपती नसून श्रद्धा, परंपरा, कुटुंबाचा एकोपा आणि सामाजिक संस्कारांचे प्रतीक बनला आहे. गणरायाची सेवा करण्याचे भाग्य लाभत राहो आणि ही परंपरा पुढील अनेक पिढ्यांपर्यंत सुरु राहो .
- Kind
- Story
- Place
- Thane
- Art
- Rules of Discipline (Vainayikī vidyā) · Kala 63
- Contributed by
- Recorded, name withheld by the contributor
- Submitted
- 18 September 2026
- Accepted
- 18 September 2026
Evidence
This entry is record #1606 in a hash chain of 2,051. Each record commits to the one before it, so a change to any earlier record breaks every hash after it.
Record hash2ca50dedddff367979c9bce17a7d34c3a5bec4acb7062da2c1daddf840288a6a
Chain head5d4bccfe2524bc72c35fa2940e30eb3a6c2d65e9d5f493f1cad3dc0e6b3c3c1e
The chain verifies end to end as of this page load.


