bappa.org
Maharashtra Ganeshotsav Archive
2026-01595
माझा बाप्पा घरी आला

बाप्पा माझ्या घरी आला एका छोट्याशा गावात सई नावाची एक मुलगी राहत होती. गणपतीचे दिवस सुरू झाले होते. सगळ्या घरांमध्ये सजावट, आरती आणि आनंद होता; पण सईच्या घरात यावर्षी गणपती बसवण्याची परिस्थिती नव्हती. सई रोज गावातील गणपती मंडपात जायची आणि बाप्पासमोर शांतपणे बसायची. एक दिवस तिने बाप्पाला हळूच म्हटलं, “बाप्पा, मला मोठा गणपती नको… तू फक्त एकदा माझ्या घरी ये.” त्या रात्री सई झोपली. दुसऱ्या दिवशी सकाळी तिच्या दारावर एक वृद्ध गृहस्थ आले. त्यांच्या हातात एक छोटी गणपतीची मूर्ती होती. ते म्हणाले, “बाळा, ही मूर्ती माझ्याकडे जास्त होती. मला वाटलं, ही तुझ्या घरी असावी.” सईच्या डोळ्यांत आनंदाश्रू आले. तिने मूर्ती हातात घेतली आणि आईला म्हणाली, “आई… बाप्पाने माझं ऐकलं!” आईने तिच्या डोक्यावर हात ठेवला आणि म्हणाली, “बाप्पा मूर्तीच्या रूपानेच येतो असं नाही गं… कधी तो माणसाच्या रूपाने येतो, कधी मदतीच्या रूपाने आणि कधी आपल्या मनात आशा बनून राहतो.” त्या दिवशी सईने घरात एक छोटासा दिवा लावला. फुलं नव्हती, मोठी सजावट नव्हती, महागाचा प्रसाद नव्हता. होतं फक्त एक छोटंसं घर आणि बाप्पावरचं मोठं प्रेम. आणि त्या घरात पहिल्यांदाच सईला जाणवलं— “बाप्पाला घर मोठं नको असतं… त्याच्यासाठी मन मोठं असावं लागतं.” 🙏❤️ गणपती बाप्पा मोरया!
- Kind
- Story
- Place
- Ratnagiri
- Art
- Staging Plays and Tales (Nāṭikākhyāyikā-darśana) · Kala 9
- Contributed by
- Recorded, name withheld by the contributor
- Submitted
- 18 September 2026
- Accepted
- 18 September 2026
Evidence
This entry is record #1605 in a hash chain of 2,051. Each record commits to the one before it, so a change to any earlier record breaks every hash after it.
Record hashb89d133cfd2488acbc92b9dc8b21c9d495bd004d92d6036b9d536aeb43790e93
Chain head5d4bccfe2524bc72c35fa2940e30eb3a6c2d65e9d5f493f1cad3dc0e6b3c3c1e
The chain verifies end to end as of this page load.


